"नाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ पुनर्रचना
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १६:
 
==नागाचे विष==
दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात. नाग चावला आहे या भीतीनेच बहुतांशी माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वतःहून आक्रमण करत नाहीत, केलाच तर त्याच्यामागे वसंरक्षण हाच हेतू असतो.. जर नागाचा आमने सामने झालाच तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखील होऊ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे [[संवेदन प्रणाली]]वर neural systemवर परिणाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाहितर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते. विषबाधा झालेल्ला माणूस विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास तो असमर्थ होतो. जीव मुख्यत्वे [[मेंदू]]द्वारे नियंत्रित [[श्वसन प्रणाली]]चे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव जाण्यास एक तास ते दीड दिवस लागू शकतो.
 
===प्रतिविष===
नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. (पहा [http://www.lfsru.org/firstaid.htm नाग चावल्यानंतरचे प्रथमोपचार ])प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते <ref>[http://www.engin.umich.edu/~CRE/web_mod/cobra/avenom.htm Mechanism of antivenom]</ref>. Tanishk more
 
==भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थान==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाग" पासून हुडकले