"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
दुवा जोडली
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
(दुवा जोडली)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
मुंबई पश्चिम किनारपट्टीत ([[कोकण विभाग]]) [[उल्हास नदी]]च्या मुखावर असलेल्या [[साल्सेट बेट]]ांवर (साष्टी) वसले आहे. मुंबईचा मोठा भाग हा [[समुद्रसपाटी]]च्या पातळीत आहे. जमिनीची उंची सरासरी १० ते १५ मी. आहे. उत्तर मुंबईचा भूभाग [[डोंगर]]ाळ आहे. मुंबईतील सर्वांत उंच भूभाग हा समुद्रसपाटीपासून ४५० मीटर (१,४५० फूट) उंचीवर आहे.
 
मुंबईचे दोन वेगवेगळे भाग आहेत - [[मुंबई जिल्हा]] व [[मुंबई उपनगर]] जिल्हा. मुंबई जिल्ह्याला "आयलंड सिटी" किंवा दक्षिण मुंबई म्हणतात. मुंबईचे एकूण क्षेत्रफळ ६०३.४ चौरस किलोमीटर आहे ज्यामधील ४३७.७१ चौरस किलोमीटर [[बृहन्मुंबई महानगरपालिका|बृहन्मुंबई]] महानगरपालिकेच्या हद्दीत येते व इतर भाग मुंबई पोर्ट ट्रस्ट, अणुऊर्जा कमिशन आणि [[संजय गांधी राष्ट्रीय उद्यान|संजय गांधी राष्ट्रीय उद्या]]<nowiki/>नाकडे आहेत.
 
मुंबईला पाणीपुरवठा करणारे सात तलाव/धरणे आहेत - [[भातसा]], [[तानसा]], [[तुळशी]], विहार, लोवर वैतरणा, अप्पर वैतरणा व [[पवई]]. विहार व पवई तलाव शहराच्या हद्दीत आहेत तर [[तुळशी]] तलाव बोरीवली उद्यानाच्या जवळपास आहे. तीन नद्या - दहिसर, पोईसर व ओशिवरा (ऊर्फ वालभट) या बोरीवली राष्ट्रीय उद्यानातून उगम पावतात व [[मिठी नदी]] (ऊर्फ माहीम नदी) तुळशी तलावातून सुरू होते. याशिवाय शहराच्या उत्तरेला उल्हास नदी आहे. उल्हास नदी कर्जतच्या डोंगरात उगम पावते आणि विरारजवळ समुद्राला मिळते. माहीम नदी माहीमच्या खाडीत लुप्त होते.
४२

संपादने