"मुंबई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवा जोडली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
दुवा जोडली
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? दृश्य संपादन
ओळ १५५:
[[चित्र:मुंबई शेयर बाजार.jpg|left|thumb|200px|मुंबई समभाग बाजार]]
 
मुंबई भारताची आर्थिक [[राजधानी]] म्हणून ओळखली जाते. भारतातील १०% कारखाना-रोजगार (Factory employment), ४०% [[प्राप्तिकर]], २०% केंद्रीय कर (Central excise), ६०% आयात कर, ४०% परदेश व्यापार आणि ४० अब्ज रुपये (९ अब्ज अमेरिकन डॉलर्स) व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. महत्त्वाच्या आर्थिक संस्थांची कार्यालये मुंबईत असून [[मुंबई शेअर बाजार]], [[भारतीय रिझर्व बँक]], नॅशनल स्टॉक एक्सचेंज, टाटा, गोदरेज व रिलायन्स समूह अशा मोठ्या उद्योगसमूहांच्या मुख्य कचेऱ्या मुंबईत आहेत. २००८ साली मुंबईचे [[वार्षिक सकल उत्पन्न]] {{रुपया}}९,१९,६०० कोटी इतके होते व प्रती व्यक्ती आय {{रुपया}}१,२८,००० होती, जी राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. अनेक आंतरराष्ट्रीय बँका व कंपन्यांच्या शाखा मुंबईत आहेत.
 
[[इ.स. १९८०|१९८०]] पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता [[अभियांत्रिकी]], दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/मुंबई" पासून हुडकले