"अलेक्झांडर द ग्रेट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५१:
===जन्म व बालपण===
 
इ.स.पूर्व ३५६ मध्ये (Μακεδονία) [[मॅसेडोनिया]]चा राजा [[फिलिप दुसरा, मॅसेडोन|फिलिप दुसरा]] आणि त्याची चौथी पत्‍नी [[ऑलिंपियास]] यांच्या पोटी [[पेल्ला]] येथे अलेक्झांडरचा जन्म झाला. अलेक्झांडरच्या जन्माविषयी एक प्रसिद्ध आख्यायिका अशीही सांगितली जाते की तो फिलिपचा पुत्र नसून सर्वोच्च ग्रीक देव [[झ्यूस]] याचा पुत्र होता. याचे कारण अलेक्झांडरची आई ऑलिंपियास हिचा गूढ विद्यांवर विश्वास होता आणि तिच्याकडे एक सापही पाळलेला होता. साप हे झ्यूसचे प्रतीक मानले गेल्याने अलेक्झांडर हा साक्षात देवाचा पुत्र असल्याची वावडी उठवली गेली. या कथेत फारसे तथ्य नसले तरी राज्यविस्तार व स्वार्‍यांच्या दरम्यान अजिंक्य ठरण्यास अलेक्झांडरला तिचा खूप मोठा उपयोग झाल्याचे सांगण्यात येते.[[Image:AlexanderAndLion.jpg|thumb|300px|सिंहासोबत लढणारा अलेक्झांडर ]
 
फिलिपच्या सततच्या स्वार्‍यांमुळे लहानपणापासून अलेक्झांडरची आपल्या आईशी आणि सख्खी बहीण [[क्लिओपात्रा, अलेक्झांडर द ग्रेटची बहीण |क्लिओपात्रा]] हिच्याशी वडिलांपेक्षा जास्त जवळीक होती.