"माती" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ११:
#'''मूळ खडक''' : प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्वाचा घटक असतो. प्रदेश्याच्या हवामानानुसार आणि खडकांच्या काठीण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते.त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदा .महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरील बेसौल्त या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला ‘रेगुर मृदा ’ असे म्हणतात. दक्षिण भारतातातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकांपासून ‘तांबडी मृदा ’ तयार होते.
#'''प्रादेशिक हवामान :''' मृदानिर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्वाचा घटक आहे.मूळ खडकाचे विदारण होणे,हा मृदानिर्मितीतील पहिला टप्पा असतो.विदारण प्रक्रिया हि प्रदेश्याच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता तरावते .एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते.उदा , सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसौल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जम्भी मृदा तयार होते. हा नृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणार्या रेगुर मृदेपेक्षा वेगळा आहे.
#'''जैविक घटक:''' खडकांचे विदारण होऊन त्याचा भुगा तयार होतो;परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भूग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते, हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात.वनस्पतींची मुळे,पालापाचोळा ,प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात ,तसेच त्यांचे विविध जीवान्मार्फात विघटन होते .उदा ,गांडूळ ,वाळवी,गोम ,मुंग्या .अशा विघटीत झालेल्या जैविक पदार्थास ‘ह्युमस’ असे म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल,तर मृदा सुपीक असते .अनेक जीवन्मार्फात विघटनाची प्रक्रिया होत असते. त्यामुळेच अलीकडे गांडूळखतनिर्मितीचे प्रयोग मोठया प्रमाणात केले जातात.
#
{{विस्तार}}
|