"आंबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २०:
कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे.
 
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत वापरण्यात येतात. आंबा हे [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि [[फिलिपिन्स|फिलिपाईन्सचे]] राष्ट्रचिन्ह आहे. सातारा येथेसुद्धा आंब्याचे खूप मोठे उत्पादन होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.marathisrushti.com/articles/mango-the-national-fruit-of-india/|शीर्षक=आंबा – भारताचे राष्ट्रीय फळ – Marathisrushti Articles|संकेतस्थळ=www.marathisrushti.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
 
जगाच्या आंबा उत्पादनापैकी ५६ टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास १३०० जातींची नोंद आहे. परंतु २५ ते ३० जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची सिंधू ही जात विकसित केली आहे.
ओळ ४८:
आंब्याची कोवळी पाने चावून नंतर टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खोकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायोरीयाही कमी होतो. आंब्याच्या पानांचा चीक टाचांच्या भेगा कमी करण्यास उपयुक्त आहे. आंब्याचा गोंदाचा सांधेदुखीत खूपच उपोयोग होता. ऐरेंड तेल, लिंबाचा रस, हळद आणि आंब्याचा गोंद सम प्रमाणात घेऊन ते मिश्रण शिजवून एकजीव करावे. त्याचा लेप सांधा निखळणे, पाय मुरगळणे, लचाकणे ह्यासाठी गुणकारी आहे.
पिकलेला आंबा शक्तीवर्धक आणि अतिशय रुचकर आहे. आंब्याने शरीराची कांती सुधारते आणि पोषणही उत्तम होते. आंब्यात अ आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत. अ जीवनसत्व जंतुनाशक तर क जीवनसत्व त्वचारोग हारक आहे. त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. आंबा उष्ण असल्यामुळे त्याचे अतिसेवन त्रासदायक ठरते. तसेच कैरीचे अतिसेवन पोटाचे विकार वाढवते. कैरी खाल्यावर पाणी पिऊ नये किंवा लहान मुलांना कैरीचे पन्हे जास्त प्रमाणात देऊ नये.
आयुर्वेदाच्या दृष्टीने आंबा आणि दूध एकत्र करून पिणे विरुद्ध आहार मानतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.maayboli.com/node/26408|शीर्षक=आ॓बा- औषधी वनस्पती {{!}} Maayboli|संकेतस्थळ=www.maayboli.com|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
 
== उपयोग ==
ओळ ६१:
 
[[चित्र:Mango flower.jpg|thumb|left|आंब्याचा मोहोर]]<br />
==आंब्याच्या जाती<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mr.vikaspedia.in/rural-energy/environment/91c94893593593f93593f92792493e-93592893894d92a924940/90690292c93e|शीर्षक=आंबा|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांकॲक्सेसदिनांक=९-१२-२०१९}}</ref>==
{| class="sortable"
|+'''भारतातील आंब्याच्या काही नामांकित जाती व त्यांच्या लागवडीचे मुख्य प्रदेश'''
"https://mr.wikipedia.org/wiki/आंबा" पासून हुडकले