"ॲमेझॉन नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ २३:
ऍमेझॉन नदीची एकुण लांबी ६,४०० किमी आहे व ७०.५ लाख वर्ग किमी क्षेत्रफळ व्यापलेले ऍमेझॉनचे खोरे हे जगातील सर्वांत मोठे आहे.
 
ऍमेझाॅन' ही अमेरिका खंडाच्या दक्षिण तुकड्यातील महाकाय नदी. पृथ्वीवरील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी  व अलिकडच्या मोजणीप्रमाणे सर्वाधिक,  सुमारे सात हजार किलोमीटर लांब नदी. या नदीच्या पात्राची सर्वाधिक रूंदी १२० किलोमीटर आहे. यामुळे पलिकडचा तीर दिसत नसणाऱ्या ऍमेझाॅनला "समुद्रनदी" म्हणतात. पेरु, कोलंबिया व मुख्यत्वे ब्राझील देशातून वाहणाऱ्या या नदीचे पाणलोट क्षेत्र व उपनद्यांची खोरी हे पृथ्वीवरील अदभूत क्षेत्र आहे. याची व्याप्ती भारताच्या क्षेत्रफळाच्या जवळजवळ पाच पट आहे. पाण्यात  सूर मारून बुडी घेऊन मासा पकडून वर झेप घेणारे आॅस्प्रेसारखे पक्षी आपणास माहीत आहेत. पण ऍमेझाॅन च्या काही क्षेत्रातील नेहमी बुडालेल्या  जंगलात पाण्यातून वर हवेत आठ दहा फूट झेप घेऊन झाडांवरील पक्षी पकडून पुन्हा पाण्यात सूर मारणाऱ्या मत्स्यजाती आहेत. पिरान्हा मासा, ४० फूटापेक्षा जास्त लांब अॅनाकोंडाॲनाकोंडा सर्प यांसह कोट्यावधी वैशिष्टय़पूर्ण जीवजातींची धारणा करणाऱ्या या अॅमेझाॅनच्याॲमेझाॅनच्या जंगलात पृथ्वीवरील सर्वाधिक जैविक विविधता व प्रति घन मीटर वार्षिक जैव वस्तुमान उत्पादकता  आहे.
 
दक्षिण अमेरिका खंडातील या नदीचा वेगवान व बलवान प्रवाह अनेक उपनद्यांचे पाणी घेत, वळणे घेत पूर्वेकडे  वाहतो व नदीमुखातून  जवळजवळ २०० किलोमीटर पर्यंत अटलांटिक महासागरात आत शिरतो व तेथपर्यंत सागरात नदी म्हणून अस्तित्व दाखवतो.[[File:Amazon-river-NASA.jpg|इवलेसे|उजवे|300px|ऍमेझाॅन नदीचे उपग्रहाद्वारे घेतलेले चित्र]]