"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १:
[[चित्र:Parvati Hill 2008.jpg|thumb|right|250px|पर्वती टेकडीचे पायथ्यानजीकच्या निवासी उपनगरातून घेतलेले छायाचित्र (इ.स. २००८च्या सुमारास)]]
'''पर्वती''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. सुमारे १०३ पायर्‍या चढून येथे पोहोचता येते.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref> या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर ''देवदेवेश्वर मंदिर'' व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान असलेल्या [[नानासाहेब पेशवे]] यांनी देवदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, [[इ.स. १७४९]] रोजी हे मंदिर उभे राहिले <ref name="मश्रीदीक्षित">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = असे होते पुणे | लेखक = दीक्षित,म.श्री. | प्रकाशक = उत्कर्ष प्रकाशन, पुणे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = ४९ | आय.एस.बी.एन. = ८१-७४२५-०६२-X | भाषा = मराठी }}</ref>.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref>
 
 
== मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे ==
पर्वतीवर देवदेवेश्वराच्या मुख्य मंदिराशिवाय [[कार्तिकेय]], [[विष्णू]], [[विठ्ठल]]-रुक्मिणी इत्यादी दैवतांची मंदिरे आहेत. यांपैकी कार्तिकस्वामी मंदिर, श्रीविष्णू मंदिर, होमशाळा इत्यादी इमारती देवदेवेश्वर मंदिरानंतरच्या काळात बांधल्या गेल्या. [[पानिपताची तिसरी लढाई|पानिपताच्या तिसर्‍या लढाईतील]] मराठ्यांच्या प्रचंड हानीमुळे खचून गेलेल्या नानासाहेब पेशव्यांचे प्राणोत्क्रमण जून, इ.स. १७६१मध्ये१७६१ मध्ये येथील होमशाळेत झाले<ref name="मश्रीदीक्षित"/>.मुख्य मंदिर आधुनिक हिंदू शैलीत बांधलेले आहे. त्याचा कळस उंच व निमुळता असून त्यावर सोन्याचा मुलामा दिला आहे. मंदिर परिसरातील चौकोनी बैठकीच्या चार कोपर्‍यात चार लहान मंदिरे आहेत ती सूर्यदेव (आग्नेय), गणेश (नैर्ऋत्य), अंबाबाई (वायव्य) आणि विष्णू (ईशान्य) यांना समर्पित आहेत. इ स १७६६ मध्ये माधवराव पेशव्यांनी ज्याच्यात चार लहान मंदिरे आणि एक मुख्य मंदिर यांचा समावेश होतो, असे हे शिव पंचायतन विकसित केले. मंदिरात भगवान शंकर, पार्वती आणि गणेश यांच्या धातूच्या मूर्ती आहेत. त्या तीन मूर्ती १७४९ मध्ये मुळात सोन्याच्या बनवलेल्या होत्या; १९३२ मध्ये त्या चोरीला गेल्या व त्याजागी त्याच्या हुबेहूब दुसर्‍या अन्य धातूच्या मूर्ती ठेवल्या गेल्या. मुख्य मंदिराच्या पश्चिमेला भगवान कार्तिक स्वामींचे मंदिर आहे. तिथे महिलांना प्रवेश वर्ज्य आहे.
 
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले