"त्र्यंबक शंकर शेजवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→चरित्र: पुरस्कार मुद्दा जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ४२:
मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले.<ref name=":0" /> ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७९)</ref> प्रगती साप्ताहिक बंद पडल्याने शेजवलकरांना मानसिक धक्का बसला आणि त्यातून सावरायला त्यांना काही वर्षे लागली. १९३९ ह्या वर्षी पुण्यातील डेक्कन कॉलेजचे पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (पोस्ट ग्रॅज्युएट ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये) रूपांतर झाल्यावर तिथे ऑगस्ट १९३९मध्ये त्यांची मराठा इतिहासाचे प्रपाठक (रीडर) म्हणून नेमणूक करण्यात आली.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८०)</ref> २५ मे १९५५पर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८५)</ref> निवृत्तीनंतर त्यांचे इतिहासविषयक संशोधन चालू राहिले. ह्या काळातच त्यांचे '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''' हे ग्रंथ प्रकाशित झाले. मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. २८ नोव्हेंबर १९६३ ह्या दिवशी त्यांचे निधन झाले.
==पुरस्कार==
{| class="wikitable" style="text-align: center; width: 200px; height: 200px;"
|-
|क्रमांक
|मिळालेले पुरस्कार व सन्मान
|वर्ष
|नोट्स
|-
|१
|साहित्य अकादमी पुरस्कार -श्री शिव छत्रपती शोध निबंधासाठी
|१९६६
|
|}
== संदर्भ ==
|