"त्र्यंबक शंकर शेजवलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
इतिहास लेखन कार्य हा मुद्दा जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३४:
}}
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (२५ मे [[इ.स. १८९५|१८९५]] - २८ नोव्हेंबर [[इ.स. १९६३|१९६३]]) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक, संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे. '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''', '''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन '''प्रगती''' साप्ताहिकातून प्रकाशित झाले आहेत. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.
==इतिहास लेखन कार्य==
 
==चरित्र==
[[रत्‍नागिरी जिल्हा|रत्‍नागिरी जिल्ह्याच्या]] [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे [[मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़]] संस्थापकांपैकी एक होते.<ref>शेजवलकर, त्र्यंबक शंकर; '''माझे वडील'''; तरुण भारत : दीपावली विशेषांक; १९६५; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. १३) </ref> [[मुंबई]]च्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी '''मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव''' ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही.<ref name=":0">खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७८)</ref>