"अंबाजोगाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎दळणवळण: रेल्वे स्थानक
देवी व नाव
ओळ २१:
| तळटिपा =
}}
'''अंबेजोगाई''' किंवा अंबाजोगाई हे [[महाराष्ट्र]]ाच्या [[बीड जिल्हा|बीड जिल्ह्यातील]] एक तालुक्याचे ठिकाण आहे. यास प्राचीन काळी अंबानगरी व जयवंती राजाच्या काळात जयवंतीनगर म्हणून ही ओळखले जाई. निजामच्या राज्यात या गावाचे नाव बदलून मोमिनाबाद असे ठेवले गेले होते.

गावाचे नाव, येथे अवतरित झालेल्या देवी पार्वतीच्या (अंबा बाई) व तिचे येथेच माहेर असल्यामुळे (जोगाई) असे एकत्रित होऊन झालेले आहे. ही महाराष्ट्रातील ब-याच जणांची कुलदेवता, कुलदेवी असून, ते येथे दर्शनासाठी येत असतात.

मराठी भाषेचा उगम बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झाला, याबाबत सर्व भाषातज्ञांचे एकमत आहे. त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते. मराठी भाषेचे आद्यकवी मुकुंदराज यांनी विवेकसिंधु या ग्रंथांची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
स्वामी रामानंद तीर्थ यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्याची सुरुवात देखील अंबाजोगाई येथे मराठी शाळा स्थापना करून केलेली आहे. तत्कालीन कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या समितीने भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन करावे याबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल शासनास सादर केलेला आहे. जागतिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनात वेळोवेळी याबाबतचे ठराव झाले आहेत, असे असताना शासनाने मराठी भाषेचे पहिले अभिमत विद्यापीठ मुंबई येथे सुरू करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथे मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ.अमरसिंह पंडित यांनी केली.