"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

५०३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
बदलत्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमेही ग्रंथालयांमध्ये दिसून येतात.आज डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना रूढ होत आहे.अनेक नवीन कल्पना ग्रंथालयात बघायला मिळतात ग्रंथालयाचे विविध प्रकार अस्तित्व मध्ये आहेत कार्पोरेट व इंडस्ट्री क्षेत्रांमध्ये स्वतंत्र ग्रंथालय ही तेथील कर्मचारी, व्यवस्थापक व अधिकारी, इंजिनियर्स यांच्यासाठी उपलब्ध असतात. वेळेनुसार व आवडीनुसार या ग्रंथालयाचा या लोकांना लाभ घेता येतो. आज वैयक्तिक स्तरावर देखील ग्रंथालय तयार केली जातात. शिक्षक, प्राध्यापक डॉक्टर, तसेच व्यापारी हे आपल्या आवडीनुसार आपल्या घरांमध्येच ग्रंथालय तयार करतात. आपल्या व्यवसाय नुसार ग्रंथसंग्रह जतन करणे त्याचं वाचन करणे अशा स्वरूपामध्ये ही ग्रंथालय उभी राहताना दिसतात. आज शासकीय स्तरावर देखील ग्रंथालयाची चळवळ उभारली जात आहे. सार्वजनिक ग्रंथालय हा त्याचाच एक भाग आहे. मात्र पुरेसा निधी आणि सामाजिक मदती च्या अभावे अनेक चांगली ग्रंथालये आज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
 
नवीन ग्रंथालयांचे स्वरूप हे संगणकीय होते आहे. आंतरजालावरून माहितीचा शोध शक्य होतो. तसेच योग्य ते सदस्यत्व घेऊन त्या त्या ग्रंथालयाच्या संकेतस्थळावर माहितीचा शोध घेता येतो. आज संपूर्ण जगामध्ये डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना आलेली आहे डिजिटल ग्रंथालयाच्या साह्याने तुम्हाला जगभरातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथ हे ग्रंथालय मधून वाचता येणे शक्य झालेले आहे इतकच नाही तर तुम्ही त्या ग्रंथालयाचे सदस्य म्हणून नोंद करून तुम्हाला त्या पद्धतीचे ही सुविधा उपलब्ध करून दिले जाते आज माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे त्यादृष्टीने ग्रंथालय ही वेगळ्या पद्धतीने विकसित होत आहेत ग्रंथालयाच्या संदर्भामध्ये सामाजिक संघटनांनी अथवा सामाजिक संस्थांनी पुढे येऊन तसेच सरकारने योग्य ती जबाबदारी स्वीकारण्यास ही ग्रंथालय चळवळ ही ग्रंथालय चळवळ पुढे जाण्यास नक्कीच मदत होईल
 
कमीतकमी वेळेत योग्य ते वाचन साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि ज्ञान साधनांचा वाढलेला आवाका, प्रकाशनांची प्रचंड उपलब्धता, माहितीतील वाढ, ग्रंथालयाच्या आर्थिक समस्या इ.सारख्या अनेक घटकांचा विचार करता विविध प्रकारच्या सेवांचे आयोजन ग्रंथालयांना करावे लागत आहे.
२६७

संपादने