"राष्ट्रपती भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: संदर्भ जोडला
→‎top: संदर्भ जोडला
ओळ ९:
ब्रिटीश वास्तुरचनाकार एडविन लँडसीअर ल्युटेन याला वास्तुच्या आराखड्याची प्राथमिक जबाबदारी देण्यात आली. पूर्ण झालेली वास्तू बरीचशी ल्युटेन्सने हर्बर्ट बेकरला शिमला येथून पाठवलेल्या रेखाचित्राप्रमाणेच होती. ल्युटेन्सच्या या डिझाईनमधील रंग आणि तपशीलांवर भारतीय वास्तुकलेचा प्रभाव आहे.  व्हॉईसरॉय हाऊस आणि सचिवालयाच्या इमारती बांधण्याचे काम ल्युटेन्स आणि बेकार यांनी मैत्रीपूर्ण वातावरणात सुरू केले. व्हॉईसरॉय हाऊसच्या समोरील सचिवालयाच्या इमारतींचे काम बेकर करणार होता. सुरुवातीच्या आराखड्यानुसार व्हॉईसरॉय हाऊस  रायसीना टेकडीवर बांधले जाणार होते आणि सचिवालयाच्या इमारती खालच्या बाजूला असणार होत्या. नंतर या दोन्ही इमारती पठारावर बांधण्याचे ठरले. व्हॉईसरॉय हाऊस  ४०० यार्ड मागे असणार होते. ल्युटेन्सला  व्हॉईसरॉय हाऊस उंचावर हवे होते, त्याला ते ठरलेल्या जागेपासून मागे आणावे लागले, यावरून त्याचे आणि बेकरचे वाद झाले.
 
ल्युटेन्सने सुमारे २० वर्षे जवळजवळ दरवर्षी भारत ते  इंग्लंड असा प्रवास केला आणि दोन्ही देशात व्हॉईसरॉय हाऊसच्या बांधकामासाठी काम केले. लॉर्ड हार्डिंग्जने आर्थिक तरतुदीत कपात केल्यामुळे ल्युटेन्सने राष्ट्रपती भवनाचा आकार १३,०००,००० घनफुटांवरून ८,५००,००० घनफुटांवर आणला. खर्च कमी करण्याचा आदेश  हार्डिंग्जने दिला असला, तरी या वास्तूची भव्यता कमी होऊ नये, असे त्याचे म्हणणे होते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=YVQJvcI1XeoC&pg=PA320&dq=The+Life+of+Sir+Edwin+Lutyens+viceroy+house&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjHlNb45ozmAhWFQN4KHSnMBGYQ6AEIOzAD#v=onepage&q=The%20Life%20of%20Sir%20Edwin%20Lutyens%20viceroy%20house&f=false|title=A History of Interior Design|last=Pile|first=John F.|date=2005|publisher=Laurence King Publishing|isbn=978-1-85669-418-6|language=en}}</ref>
 
जेव्हा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून पदभार स्वीकारला आणि ते या इमारतीत राहायला आले, तेव्हा त्यांनी  केवळ काही खोल्यांचाच वापर केला. तो आता राष्ट्रपतींच्या कुटुंबाच्या वास्तव्याचा भाग आहे आणि पूर्वीच्या व्हॉईसरॉयच्या वास्तव्याच्या भागाचे रूपांतर  अतिथींसाठीच्या खोल्यात करण्यात आले. भारताला भेट देणारे परदेशी राष्ट्रप्रमुख येथे राहतात.