"राष्ट्रपती भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎top: माहितीत भर घातली.
→‎top: संदर्भ जोडला
ओळ ५:
फोर्ट विल्यमचे गव्हर्नर जनरल एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत बेल्वेदेर हाऊस, कोलकाता येथे रहात असत. त्यानंतर गव्हर्मेंट हाऊस, कोलकाता (आत्ताचे राजभवन, कोलकाता) बांधण्यात आले. लॉर्ड वेलस्लीच्या आज्ञेप्रमाणे १७९९ ते १८०३ या काळात एक भव्य राजमहाल बांधण्यात आला. आणि १८५४ मध्ये बंगालच्या लेफ्टनंट गव्हर्नरने तिथे राहण्यास सुरुवात केली. डिसेंबर १९११ मध्ये दिल्ली दरबाराच्यावेळी नवी दिल्लीमध्ये ब्रिटीश व्हॉईसरॉयसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचा निर्णय घेण्यात आला, कारण आता भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला हलवण्यात येणार होती.
 
जुन्या दिल्लीच्या दक्षिणेला नवी दिल्ली हे शहर वसवण्याचा आराखडा तयार करण्यात आला तेव्हा, भारताच्या व्हॉईसरॉयच्या नवीन राजवाड्यासाठी विस्तीर्ण जागा आणि महत्त्वाचे स्थान राखून ठेवण्यात आले.  या व्हॉईसरॉय हाऊससाठी आणि त्याच्या जवळच्या सचिवालय इमारतींसाठी सुमारे ४,००० एकर जागेचे संपादन करण्यात आले. यासाठी इथे असलेली रायसीना आणि माल्चा ही गावे आणि तेथील ३०० कुटुंबे भूसंपादन कायद्याच्या अंतर्गत विस्थापित करण्यात  आली.[https://www.telegraph.co.uk/news/worldnews/asia/india/8681785/New-Delhi-villagers-seek-compensation-100-years-after-being-evicted-by-Raj.html]
 
ब्रिटीश वास्तुरचनाकार एडविन लँडसीअर ल्युटेन याला वास्तुच्या आराखड्याची प्राथमिक जबाबदारी देण्यात आली. पूर्ण झालेली वास्तू बरीचशी ल्युटेन्सने हर्बर्ट बेकरला शिमला येथून पाठवलेल्या रेखाचित्राप्रमाणेच होती. ल्युटेन्सच्या या डिझाईनमधील रंग आणि तपशीलांवर भारतीय वास्तुकलेचा प्रभाव आहे.  व्हॉईसरॉय हाऊस आणि सचिवालयाच्या इमारती बांधण्याचे काम ल्युटेन्स आणि बेकार यांनी मैत्रीपूर्ण वातावरणात सुरू केले. व्हॉईसरॉय हाऊसच्या समोरील सचिवालयाच्या इमारतींचे काम बेकर करणार होता. सुरुवातीच्या आराखड्यानुसार व्हॉईसरॉय हाऊस  रायसीना टेकडीवर बांधले जाणार होते आणि सचिवालयाच्या इमारती खालच्या बाजूला असणार होत्या. नंतर या दोन्ही इमारती पठारावर बांधण्याचे ठरले. व्हॉईसरॉय हाऊस  ४०० यार्ड मागे असणार होते. ल्युटेन्सला  व्हॉईसरॉय हाऊस उंचावर हवे होते, त्याला ते ठरलेल्या जागेपासून मागे आणावे लागले, यावरून त्याचे आणि बेकरचे वाद झाले.