"भगतसिंग कोश्यारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎top
ओळ १:
 
भगत सिंह कोश्यारी यांचा जन्म १७ जून १९४२ रोजी झाला आहे. उत्तराखंडमधील भाजपाचे सदस्य ते राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. तसेच उत्तराखंडमधील भाजपाचे पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. २००१ ते २००२ मध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा कारभार केला होता. तसेच २००२ पासून २००७ पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८ ते २०१४ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले होते. भगत सिंह कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. १९७७ मधील आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरूंगवासही भोगलेला आहे. ३१ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.maharashtra.gov.in/1136/1188/|संकेतस्थळ=https://www.maharashtra.gov.in|अॅक्सेसदिनांक=22 नोव्हेंबर 2019}}</ref>
 
== परिचय ==