"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २१:
==चरित्र==
===बालपण आणि किशोरावस्था : १९३१-१९५०===
[[मध्य प्रदेश]] राज्यातील [[रायसेन जिल्हा|रायसेन]] जिल्ह्यात असलेल्या कुचवाडा नावाच्या खेड्यात (आईच्या आजोळी) [[तारणपंथी]] [[जैन]] कुटुंबात चंद्र मोहन जैन ऊर्फ ओशो यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बाबुलाल जैन हे कापडाचे व्यापारी होते. ओशोंनंतर त्यांना आणखी दहा अपत्ये झाली. ओशोंच्या आईचे नाव सरस्वती होते. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत ओशो आजोळीच राहिले. खुद्द ओशोंच्या म्हणण्यानुसार आजीने दिलेल्या मोकळिकीचा त्यांच्या जडणघडणीवर परिणाम झाला. सातव्या वर्षी आजोबांचे निधन झाल्यानंतर ओशो गदरवारा येथे आपल्या आईवडिलांसोबत राहावयास गेले. आपल्या आजोबांच्या निधनाचा ओशोंच्या मनावर खोल परिणाम झाला होता. ओशो १५ वर्षांचे असताना त्यांची बालपणातील मैत्रीण आणि चुलतबहीण शशी हिचा [[विषमज्वर]] होऊन मृत्यू झाला. मृत्यूच्या या दर्शनाने ते बालपणात आणि तारुण्यावस्थेत मृत्यूविषयी अधिक चिंतन करू लागले.<ref>ओशोकम्यून.ऑर्ग http://www.oshocommune.org/early-years-1931-1967.html</ref> शाळेत असताना ते बंडखोरपणे वागत असले तरी त्यांच्यातील प्रतिभा आणि दर्जेदार वाद-प्रतिवाद करण्याची त्यांची क्षमता लपून राहिली नाही.
 
===विद्यापीठातील वर्षे आणि सार्वजनिक वक्ते : १९५१-१९७०===
"https://mr.wikipedia.org/wiki/ओशो" पासून हुडकले