"ओशो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎पुणे आश्रम : १९७४-१९८१: शब्द बदलला, मराठी केला
छो →‎पुणे आश्रम : १९७४-१९८१: शब्द बदल केला, allergy चे मराठी भाषांतर दिले
ओळ ४३:
 
===पुणे आश्रम : १९७४-१९८१===
मुंबईच्या दमट जलवायुमानामुळे ओशोंना [[मधुमेह]], [[दमा]] आणि विविध [[प्रतिक्रियात्मक आजार|दमा]] ह्या व्याधी जडल्या. सन १९७४ मध्ये ओशो पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये निवासास आले. मा योग मुक्ता (कॅथरीन व्हेनिझिलोस) हिच्या मदतीने त्यांनी ही जागा विकत घेतली होती. इथे सन १९८१ पर्यंत ओशो शिकवीत राहिले. ही जागा आजच्या ओशो आंतरराष्ट्रीय ध्यानकेंद्राच्या मध्यभागी आहे. या जागेवरच ध्वनिमुद्रण आणि नंतर ध्वनिचित्रमुद्रण सुरू झाले. ओशोंच्या व्याख्यानांचे मुद्रणही इथे सुरू झाले आणि त्यांच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार वाढला. पाश्चिमात्य अभ्यागतांची संख्या खूप वाढली. या जागेवर नंतर कपडे, दागदागिने, मृत्तिकाशिल्पे व सेंद्रिय सौंदर्यप्रसाधने बनविणारे केंद्र उभे राहिले; रंगमंच, संगीत व मूकाभिनयाचे कार्यक्रम इथे होऊ लागले. सन १९७५ नंतर पुण्यात ह्युमन पोटेन्शिअल मूव्हमेंटमधील मानसोपचारक आले आणि ध्यानासोबतच अशा उपचारपद्धती हा आश्रमाच्या मिळकतीचा मोठा स्रोत ठरला.
 
ओशोंचा पुण्यातील आश्रम ही एक गजबजलेली जागा होती. सकाळी ध्यान, मग 'बुद्ध हॉल'मध्ये एक ते दीड तासांची ओशोंची विविध विषयांवरील व्याख्याने आणि प्रश्नोत्तरे; दिवसभर विविध उपचार आणि रात्री ओशोंचा शिष्यांशी आणि श्रोत्यांशी वैयक्तिक संवाद, नव्या शिष्यांना दीक्षा देणे असा दिवसभराचा कार्यक्रम असे.
"https://mr.wikipedia.org/wiki/ओशो" पासून हुडकले