"बानू कोयाजी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ जोडणे
भर घातली
ओळ ६०:
==कामाचा विषय==
डॉ.बानूबाईंनी आपले काम के.ई.एम. पुरते मर्यादित ठेवले नाही. आपल्या समाजातील स्त्रियांचे आरोग्य, त्या विषयीचे प्रश्न, त्यातील समस्या याविषयी त्यांना अचूक भान होते. सन १९७८ पासून त्यांनी ग्रामीण भागात वैद्यकीय कामाचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी १९४० मध्ये श्री.र.धो. कर्वे यांच्यापासून प्रेरणा घेऊन काही वर्षे डॉ. बानूबाईंनी कुटुंबनियोजनाचे काम प्रतिकूल परिस्थितीत केले होते. तेच काम नव्याने त्यांनी ग्रामीण भागात करण्याचे ठरविले. वडू येथे त्यांनी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली. ७ ते ११ वर्षे वयोगटातील मुलींचा गट त्यांनी त्यासाठी निवडला होता. ६०० हून अधिक मुलींना त्यांनी प्रशिक्षित केले. स्त्रियांना कुटुंबनियोजनाचे महत्त्व समजावे म्हणून शिबिरे भरवली. कुटुंबनियोजनाचा प्रसार केला. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या. ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होईल असेही प्रकल्प बानूबाईंनी सुरू केले.
डाॅ. बानू कोयाजी यांनी स्त्रियांसाठी 'इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' या संस्थेची स्थापना केली. याशिवाय अनेक वैद्यकीय संस्था, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक संस्थांशी बानूबाई संबंधित होत्या. पुणे विद्यापीठाच्या विधिसभेच्या, तसेच विद्या परिषदेच्या त्या सदस्या होत्या. <ref>{{स्रोत पुस्तक|शीर्षक=१०१ कर्तृत्ववान स्त्रिया|last=कर्वे|first=स्वाती|publisher=उत्कर्ष प्रकाशन|year=२०१४|isbn=978-81-7425-310-1|location=पुणे|pages=१८९}}</ref>डॉ. बानू कोयाजी यांच्या कार्याचा एक स्वतंत्र विभाग होता. तो म्हणजे '''सकाळ ''' वृत्तपत्र समूहात त्यांनी केलेले काम. 'सकाळ' चे संपादक डॉ. ना.भि. परुळेकर यांच्या विनंतीवरून डॉ. कोयाजी १९५५ पासून 'सकाळ' च्या संचालक मंडळात काम करू लागल्या. डॉ. परुळेकरांच्या निधनानंतर डॉ. कोयाजी 'सकाळ'च्या संचालक झाल्या. 'सकाळ' पवार उद्योग समूहाकडे गेल्यानंतरही डॉ. कोयाजी 'सकाळ' संचालक मंडळाशी संबंधित होत्या. 'सकाळ'चे इंडिया फाऊंडेशनसारखे सर्व उपक्रम व सकाळ रिलीफ फंड यांचे कामही बानूबाईंनी डॉ. परुळेकरांनंतर चालू ठेवले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.esakal.com/pune/pune-news-dr-banu-koiyaji-72042|शीर्षक=डॉ. बानू कोयाजी स्मृती समारंभाचे आयोजन {{!}} eSakal|संकेतस्थळ=www.esakal.com|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2019-11-12}}</ref>
 
<br />
 
== योगदान ==
परिवार नियोजन, जनसंख्या नियंत्रण, समाज सेवा या विषयांमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
 
==चरित्र==