"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३:
भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत बदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कलकत्तयाच्या द्वारिका दास या फर्मने आधुनिक हातपेटीची पहिल्यांदा निर्मिती केली. त्यानंतर टी. एस्. रामचंद्र ॲन्ड कंपनीने. महाराष्ट्रात याची निर्मिती सुरू केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यांनी हातपेट्या बनवल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग [[भावनगर]]मध्ये आणि [[पालिटाणा]]मध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिती सुरू झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनविल्या जाऊ लागल्या. बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनविल्या. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा हातखंडा होता.
 
पाश्चात्त्य सुरावटींप्रमाणे बनलेले हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणले जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उस्ताद अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून ते हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविले. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविले. त्यांचेच चिरंजीव बा. गं आच्ररेकर यानीही ते कार्य पुढे चालविले. ङाँ. विद्याधर अोक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे. बेळगावचेच हरी गोरे यानी पितळेचा रस तयार करुन रीड्स बनविण्याचा कारखाना सुरू केला. स्वदेशी चळवळीला प्राधान्य देऊन त्यानी संपूर्ण भारतीय बनावटीचे हार्मोनियम बनविले. कोलकाता, दिल्ली आणि इतर संगीतपेठांत त्यांच्या हार्मोनियमला मागणी होती. वाद्यसंगीताला आवश्यक स्वरपेट्याही ते उत्तम बनवीत. म्हैसूरच्या महाराजानी त्यांचा या कार्याबद्दल गाैरवही केला होता. हरिभाऊ गोरे यांनी चार् स्वर असणार्या वाद्यांना षड्ज-पंचम- मध्यमाचा स्वरपुरवठा करणार्या छोट्या त्ंबोरापेट्याही निर्माण केल्या. पंडित पन्नालाल घोष, पंडित व्ही. जी. जोग य महान वादक कलाकारांनी या सुलभ त्ंबोरा पेट्यांचा वापर सुरु केला आणि वजनाने हलक्या व प्रवासात सहज नेऊ शकणार्या या वाद्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.
 
==सुप्रसिद्ध पेटीवादक==
"https://mr.wikipedia.org/wiki/संवादिनी" पासून हुडकले