"केसरी (वृत्तपत्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ५२:
'केसरी'च्या वृत्तपत्रीय कार्याचा आजपर्यंतच्या १३० वर्षांच्या या प्रदीर्घ काळातील वाटचालीचे अवलोकन करता इतिहासाचा अधिक धांडोळा घेणे मला क्रमप्राप्त वाटते. यातील जवळ जवळ ८० वर्षांच्या कालावधीत प्राधान्याने स्वातंत्र्यप्राप्ती व त्यानंतरचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या वातावरणात 'केसरी'चा काळ व्यतीत झाला आहे.
 
त्या काळात दृक्‌श्राव्य माध्यमे उपलब्ध नव्हती. अगदी १९६० पर्यंत रेडिओसुद्धा ग्रामीण भागात फारच दुर्मिळ होते. त्यामुळे जनसामान्यांसाठी प्रसारमाध्यमांचे काम 'केसरी' व इतर काही वृत्तपत्रांनी पार पाडले. स्वातंत्र्यप्राप्ती व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या व्यतिरिक्त देशात व राज्यात इतरही खूपच समस्या व प्रश्न होते. या प्रश्नांना ऐरणीवर आणण्याचे काम 'केसरी'ने केले. मुंबई-पुण्यासारखी मोठी शहरे वगळता तालुकास्तरीय व ग्रामीण भागात बहुसंख्य जनतेला जीवन जगतानाजगतांना प्लेग, देवी, नारू यांसारख्या रोगांच्या साथी, वैद्यकीय सुविधांचा अभाव, वारंवार पडणारे तीव्र दुष्काळ, तगाई, चारा खावटी, कर्जवसुली, सावकारी पाश, चलनांची टंचाई, अत्यंत अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, दळणवळणांसाठी आवश्यक असणाऱ्या पक्क्या रस्त्यांची आवश्यकता, अंधश्रद्धा, जुन्या कालबाह्य चालीरीती, रूढी परंपरा, बालविवाह, केशवपन, सतीची चाल, पुनर्विवाह व सामाजिक विषमता, तुटपुंजे संशोधन, लोकजागृतीमधील अभाव इत्यादी भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. ग्रामीण भागातून मुख्यत्वे धान्यटंचाई, अपुरे चलन व निरक्षरता या सर्वांत मोठ्या समस्या होत्या. एकूण समाजातील मूठभर सधन व थोडाफार शिक्षित नोकरवर्ग सोडला तर सर्वत्र सामाजिक समस्यांनी, प्रश्नांनी घेरलेले, अशी राज्य व राष्ट्राची परिस्थिती होतीच होती. या सर्व सामाजिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक व आर्थिक पातळ्यांवर बहुसंख्य सामान्य जनतेचे जीवनमान असहाय स्थितीत होते. याचीही आजच्या चंगळवादी जीवनशैलीत जगणाऱ्यांना व जगू पाहणाऱ्या समाजाला कल्पना करता येणार नाही; परंतु यातील काही थोडाफार काळ मी पाहिलेला आहे. 'केसरी'ने त्या काळातील या समाज जीवनाच्या स्थितीवर सातत्याने, प्रसारमाध्यमाची जी अत्यावश्यक भूमिका असावी लागते, ती 'केसरी' या वृत्तपत्राने सातत्याने मांडलेली आहे. मी या बाबीत माझ्या विद्यार्थिदशेपासून साक्षीदार राहिलेलो आहे.
लोकमान्यांची 'केसरी'बाबतची भूमिका, राजकीय चळवळीस हातभार लागून राजकीय स्वातंत्र्याच्या उद्दिष्टपूर्तीनंतर सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्याचे प्रवाह या राष्टात व राज्यात वाहू लागणे अपेक्षित होती. 'केसरी'ने केवळ वृत्त किंवा लोकशिक्षण हे उद्दिष्ट न ठेवता जनतेला राष्टअभ्युदयासाठी कार्यप्रवण करणे हेही महत्त्वाचे कार्य पार पाडले आहे. 'केसरी'ने विचारवंतांवर छाप पाडली असे खास करून म्हणता येईल. टिळक युगात वृत्तपत्रातून ब्रिाटिश साम्राज्यशाही विरुद्ध स्वातंत्र्यचळवळीस अनुकूल विचार मांडीत राहणे ही खासच धैर्याची बाब होती. भारतात ब्रिाटिश राज्यकर्त्यांची भूमिका वृत्तपत्र स्वातंत्र्याला खुलेपणाची नव्हती. टिळकांनी ब्रिाटिशांशी झगडून वृत्तपत्र स्वातंत्र्य मिळविले. त्याबाबत त्यांच्यावर खटलेही झाले. या बिकट परिस्थितीतून 'केसरी'ची वाटचाल सुरूच होती.