"लिंगभाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नवे प्रवाह: नवीन माहिती जोडली
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १०:
===नवे प्रवाह===
तृतीय पंथीय, अन्तःलिंगी आणि इतर लिंगभावाच्या चौकटीत न बसणाऱ्या अस्मितांनी लिंगाभावाच्या प्रस्थापित द्वैतवादी सिद्धांकानासंबंधी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्यात लिंगभावाला स्त्रिया आणि पुरुष या दोन पातळ्यांवरून न बघता त्याला अधिक व्यापक चौकटीतून बघणे अपेक्षित आहे.
 
तृतीयपंथीयांचे वैद्यक शास्त्रातील प्रकार
 
लेख...
 
तृतीयपंथी.... ( हिजडा )
 
एखादी व्यक्ती जन्मतःच नैसर्गिकरित्या लैंगिक विकृती घेऊन जन्मास येतो आणि अशा वेळेस तो स्त्री लिंग आहे की पुलिंग आहे हे स्पष्ट होत नाही. म्हणजेच तो नर आहे की मादी हे स्पष्ट होत नाही. या विकृतीलाच आपल्या समाजात तृतीयपंथी, हिजडा, समलैंगिक, छक्का किंवा नपुंसक असे संबोधले जाते.
 
वैद्यकिय भाषेत या तृतीयपंथी विकृतीचे
१) L,
२) G,
३) B,
४) T,
५) I,
६) Q,
असे सहा प्रकार सांगितले जातात. या प्रकारांचा अर्थ खालील प्रमाणे आहे.
 
L= लेस्बियन, ज्या महिलेला दुसऱ्या महिले विषयी आकर्षण वाटते तिला लेस्बियन म्हणतात. लेस्बियनपैकी जिचे व्यक्तिमत्व पुरुषासारखे असते तिला 'बुच' म्हटले जाते. ती पुरुषासारखे बोलते, कपडे घालते. पण काही लेस्बियन पुरुषासारखे राहात नाहीत, त्यांना 'फेम' म्हटले जाते.
 
G = गे, एक पुरुष दुसऱ्या पुरुषाकडे आकर्षित होतो त्याला 'गे' म्हटले जाते. मात्र या शब्दाचा वापर सर्वच समलैंगिक व्यक्तींबाबत केला जातो. यात लेस्बियन, गे, बायसेक्शुअल असे सर्वच आहेत. 'गे' कम्युनिटी किंवा 'गे पिपल' असेही त्यांना ओळखले जाते.
 
B = बायसेक्शुअल, जर कुणाला पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही लिंगाच्या व्यक्ती आवडत असतील, त्यांच्यासोबत सबंध ठेवायची इच्छा असेल त्यांना बायसेक्शुअल असे म्हणतात.
 
T= ट्रांसजेंडर, ही अशी व्यक्ती असते की जन्माच्या वेळेस तिचे लिंग वेगळे होते आणि नंतर ती व्यक्ती स्वतःला वेगळ्या लिंगाची समजते तिला ट्रांसजेंडर म्हणतात. जी ट्रांसजेंडर आपल्या मनाप्रमाणे आपला ड्रेस बदलते तिला 'क्रॉस ड्रेसर' पण म्हटले जाते. जे ट्रांसजेंडर औषधी, ऑपरेशन, हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी आणि सेक्स रिसाइनमेंट सर्जरी ने लिंग बदलवून घेतात त्यांना 'ट्रांस सेक्शुअल' म्हटले जाते. यातही लेस्बियन ट्रांसजेंडर, गे ट्रांसजेंडर, आणि बाईसेक्शुअल ट्रांसजेंडर असे प्रकार आहेत.
 
I = इंटर-सेक्स, जन्म झाल्या नंतर ती व्यक्ती स्त्री आहे की पुरुष हे कळतच नाही त्यांना इंटर-सेक्स म्हटले जाते. त्यावेळेस डॉक्टरांना जे वाटते त्याच लिंगाच्या आधारे त्यांचे नाव ठेवले जाते. पुढे मोठे झाल्यानंतर ती व्यक्ती स्वतःला स्त्री, पुरुष किंवा ट्रांसजेंडर यापैकी एक समजायला लागते.
 
Q = क्वीयर, आपण निश्चित कोणत्या लिंगाचे आहोत हेच काही जण निश्चित करू शकत नाहीत. ते स्वतःला स्त्री, पुरुष, ट्रांसजेंडर, लेस्बियन, गे, किंवा बायसेक्शुअल असे काहीच म्हणून घेत नाहीत, त्यांना 'क्वीयर' म्हणतात.
 
वरील माहीती वरून आपल्याला तृतीयपंथी म्हणजे नेमके काय ? हे अगदी सोप्या साधारण भाषेत आणि वैद्यकीय भाषेत कळलेच असेल. यावरून आपणांस एक गोष्ट नक्कीच स्पष्टपणे लक्षात आली असेल, ती ही की तृतीयपंथीसुद्धा आपल्यासारखेच नैसर्गिकरित्या आईच्या पोटातून जन्मास आले आहेत. जसे आपण नऊ महिने आईच्या पोटात वाढलो तसेच ते पण वाढले आणि या जगात आले. जसा जन्माच्या आधी आपल्याकडे कुठलाही विकल्प किंवा आवडनिवड नव्हती ( जसे श्रीमंत घराण्यात जन्म होणे, दिसायला फार सुंदर असणे, विद्वान असणे इत्यादी ) तशी यांच्याकडे पण नव्हती. निसर्गाने अशी सोय करून दिली असती तर बरे झाले असते. मग कुणीच गरीब, अस्पृश्य, दलित, तृतीयपंथी, मानसिक बीमार, मठ्ठ, भ्रष्टाचारी, अधर्मी, किंवा अपंग जन्मास नसता. असो परत मुळ मुद्द्यावर येऊ या.
 
तृतीयपंथी या विकृतीने जन्मास येणे हे एक हार्मोन असंतुलन आहे. ही कुठलीही बिमारी, आजार किंवा दैवी कोप नाही.
मग का बरे आपला सुशिक्षित समाज या लोकांना भावनिक आधार न देता, त्यांचा छळ करतो. सामाजिक मुख्य धारेत त्यांना का सामावून घेत नाही ? त्यांचा तिरस्कार करतो आणि त्यांना प्रत्येक सामाजिक, प्राथमिक आणि मानवीय सुविधेपासून दूर ठेवतो. सर्वांत गलिच्छ म्हणजे या तृतीयपंथी समुदायाचा वेशा व्यवसायासाठी वापर होतो आणि त्यांना त्या व्यवसायाकडे बळजबरीने ढकलले जाते. आता आपण म्हणाल की त्यांचे आचारण उचित नाही, असले लोक समाजात दुराचार आणि अश्लिलता पसरवतात, जबरदस्तीने पैसे वसूल करतात, अनाप-शनाप बोलतात, शिवीगाळ करतात, चोरी करतात आणि जर का आपण यांना पैसे दिले नाहीत तर चार चौघात अश्लिल इशारे आणि व्यवहार करतात. बरोबर आहे हे तृतीयपंथी नक्कीच असे वागतात.
 
पण आपण सुशिक्षित समाजाने आणि आधुनिक पाश्चात्य संस्कृतीचा पाठपुरावा करणाऱ्या समाजाने कधी शांतपणे या गोष्टींचा विचार किंवा आत्मचिंतन केले आहे काय? की, त्यांच्या असल्या वागण्याला जबाबदार कोण आहे? आपल्यासारखी ती पण माणसं असताना, त्यांना पण पोट असतांना, भावना असताना, स्वप्नं असताना, त्यांच्या पण जीवनात बऱ्याच महत्वाकांंक्षा असताना आपण त्यांना मूलभूत त्यांच्या मानवीय अधिकारांपासून वंचित ठेवले. त्यांना रोजगार नाही, शिक्षण नाही, सन्मान नाही, समाजात त्यांना कुणीही मानवीय नजरेने बघत नाही. त्यां
 
===जात आणि लिंगभाव===
"https://mr.wikipedia.org/wiki/लिंगभाव" पासून हुडकले