"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ३५:
== राजकीय कार्य==
[[चित्र:Arun Kamble with Petroleum minister SushilKumar Shinde.JPG|thumb|500px|left]]
[[चित्र:Former Prime minister V.P.Singh in action.jpg|thumb|500px|left]]
 
एम.ए.करत असतानाच त्यांचा दलित चळवळीचे नेते [[राजा ढाले]] आणि [[नामदेव ढसाळ]] यांच्याशी संबंध आला. १९७३-७४ च्या काळात त्यांनी [[दलित पँथर]]ची अधिकृतपणे स्थापना केली. दलित पँथ या संघटनेपासून त्यांनी आंबेडकरी चळवळीपर्यंतचा प्रवास केला. राजकारणात अग्रेसर असणारे कांबळे आपल्या स्फोटक आणि प्रभावी वक्तृत्वाने दलित चळवळीचा केंद्रबिंदू बनले. या संघटनेला त्यांनी वैचारिक बैठक दिली. काही वर्षांनी त्यांनी जनता दलामध्ये प्रवेश केला. तत्कालीन पंतप्रधान [[व्ही. पी. सिंग]] यांच्याशी त्यांचा घनिष्ट संबंध आला. मागास वर्गासाठी आरक्षण आणि सवलती देण्यासाठी त्यांनी तत्कालीन पंतप्रधान [[व्ही. पी. सिंग]]यांच्याकडे प्रयत्न केला. १९८४ सालच्या मंडल आयोग अंमलबजावणी परिषदेचे ते निमंत्रक होते.
 
ओळ ४७:
 
== जनता दलातील दिवस ==
 
[[चित्र:Former Prime minister V.P.Singh in action.jpg|thumb|500px|left]]
जनता पक्षाच्या कारकीर्दीत चरणसिंग यांनी ‘मंडल आयोग’ स्थापन केला होता. परंतु त्याचा अहवाल पूर्ण व्हायच्या आतच जनता सरकार गडगडले. सर्वानाच अनपेक्षित वाटेल, असा इंदिरा गांधींचा त्यानंतरच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाला. साहजिकच जनता पक्षाच्या आधारे उभे राहिलेले गट व नेते एकदम मुख्य प्रवाहाच्या बाहेर फेकले गेले. खुद्द अरुण कांबळे यांच्याही स्वतःबद्दलच्या त्या स्थानाविषयीच्या प्रतिमा उंचावल्या होत्या, आणि समाजात आपल्या विचारांनी व कृतीमुळे अर्थपूर्ण परिवर्तन आणता येईल, असे त्यांना वाटू लागले होते. परंतु वर म्हटल्याप्रमाणे जनता सरकारचा प्रयोग फसल्यावर जी अनेक माणसे पुन्हा स्वतःच्या राजकारणाचा शोध घेऊ लागली त्यात प्रा. कांबळे होते. साधारणपणे एक दशकभर मंडल आयोगाचा अहवाल बासनात गुंडाळला गेला होता. विश्वनाथ प्रतापसिंग पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आकस्मिकपणे तो अहवाल अंमलात आणला जाईल, असे घोषित केले.
त्या घोषणेलाही संदर्भ होता तो विहिंप व लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केलेल्या रथयात्रेचा. अयोध्येला ‘त्याच जागी’ म्हणजे बाबरी मशिदीच्या जागी राममंदिर बांधण्याचा निर्धार करून योजलेली ती यात्रा हे विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या सत्तेला आव्हान होते. त्या यात्रेच्या राजकारणाला शह देण्यासाठी म्हणून मंडल अहवाल बासनातून बाहेर काढायचा निर्णय व्ही. पी. सिंग यांनी केला होता; परंतु अनेक जणांना व्ही. पी. सिंग यांच्यात नव्या युगाचा ‘मसिहा’ आढळला. दुर्दम्य आशावादी असलेल्या अरुण कांबळेंनाही मंडल आयोगाच्या अंमलबजावणीत सामाजिक क्रांतीची बीजे आढळली.
 
==वाङ्‌मयीन क्षेत्र ==