"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Minor change
Minor change
ओळ ३०:
[[चित्र:Arun Kamble in young age.jpg|thumb|200px|left]]
प्रा. अरुण कांबळे यांचा जन्म १४ मार्च १९५३ साली [[सांगली]] जिल्ह्यात करगणी या गावी झाला. त्यांच्या आई शांताबाई या गटशिक्षणाधिकारी आणि वडील कृष्णाजी जीवन शिक्षण मंदिर, दिघंची या शाळेत शिक्षक होते. करगणी येथे त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयात आले. त्यांनी [[मुंबई]] येथील सिद्धार्थ महाविद्यालयातून एम.ए.ला मराठी विषयात सुवर्ण पदक मिळवले व १९७३ मध्ये प्राध्यापकी पेशात प्रवेश केला. ते १९८३ पर्यंत वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात; तर १९८३ ते १९९० पर्यंत ते दादरच्या कीर्ती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. १९९१ पासून ते मुंबई विद्यापीठात होते. कीर्ती महाविद्यालयात असतानाच त्यांनी मराठीच्या अभ्यासाबरोबरच चळवळीतही स्वत:ला झोकून दिले.
[[चित्र:Arun Kamble with Maisaheb Ambedkar.jpg|thumb|right|500px|प्रा. अरुण कांबळे माईसाहेब आंबेडकर आणि नानासाहेब गोरे यांसोबत]]
शेवटी शेवटी ते विद्यापीठाच्या मराठी विभागाअंतर्गत ते प्राध्यापक व फुले-आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. प्रा. कांबळे यांचा प्रामुख्याने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत वावर होता. चतुरस्र व्यासंगी, सडेतोड भाषा आणि प्रबळ वक्तृत्व यामुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. त्याचा विवाह आंतरजातीय असल्याकारणाने त्यांना जातीय संघर्षांना तोंड द्यावे लागले.
 
ओळ ४०:
== दलित पँथरमधील दिवस ==
[[चित्र:Arun Kamble with Dalai Lama.jpg|thumb|right|400px]]
[[चित्र:Prof. Arun Kamble at University Of Mumbai.jpg|thumb|right|400px|प्रा. अरुण कांबळे नामदेव ढसाळ, राजा ढाले, ज. वि. पवार यांसोबत]]
[[चित्र:Arun Kamble with Govindrao Adik.JPG|thumb|right|400px]]