"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७४:
* गेली अनेक वर्षे एकेक करत धीर गोळा करून उभ्या राहिलेल्या महिलांना उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याची भावना आहे,तर कॉस्बीच्या वकिलांनी अर्थातच वरिष्ठ न्यायालयात अपिलात जाण्याचे सूतोवाच केले आहे.
* कॉस्बी ही खरंतर कोणी व्यक्ती नव्हे, ती प्रवृत्ती आहे ही धारणा कॉस्बीविरोधात दाखल झालेल्या तक्रारींचे तपशील पाहून पक्की होत जाते. कॉस्बीच्या या विकृत धटिंगणशाहीला प्रथम आव्हान दिले, ते फिलाडेल्फियाच्या अँड्रिया कॉन्स्टँड या टेम्पल युनिव्हर्सिटीच्या बास्केटबॉल टीमची संयोजक असलेल्या कर्मचारी महिलेने. ती स्वत: एकेकाळी स्टार अॅथलिट होती.
* क्रीडाविषयक कार्यासाठी कॉस्बीकडून मोठ्या आदर व विश्वासाने मदत व मार्गदर्शन घेण्यासाठी त्याला अधुनमधून भेटणाऱ्या अँड्रियावर झालेल्या बळजबरीतून तिला बाहेर पडायला काही काळ जावा लागला. मात्र नंतर ती निर्धाराने उभी राहिली. खालच्या कोर्टात अक्षरश: गाळात गेलेला खटला तिने जिद्दीने वरच्या कोर्टापर्यंत खेचला.
* अँड्रियाच्या म्हणण्याला दुजोरा देण्यासाठी गेले दशकभर चाललेली 'मी टू' (# Me too movement) मोहीम ही हॉलिवूडच्या अनेक प्रख्यात अभिनेत्री, अमेरिकन टेलीव्हिजनवरील लोकप्रिय महिला अँकर आणि समाजातल्या प्रतिष्ठित महिलांच्या पुढाकाराने चाललेली वर्तमानातील अतिशय महत्त्वाची मोहीम ठरली. हा हॅश टॅग जणू स्त्रीसन्मानाच्या संघर्षाची खूण बनला.
* जाहीर कार्यक्रमांत, टेलीव्हिजन शोमध्ये या निमित्ताने हॉलिवूड आणि अन्य क्षेत्रांतीलही कास्टिंग काऊचला वाचा फुटली. अंगी कर्तृत्व आणि प्रतिभा असूनही 'बाईपणा'ची किंमत चुकवणे, आपणच किंमत चुकवलेली असूनही मानहानीच्या किंवा पुढे जाण्याच्या संधी कायमच्या हुकतील या भीतीपोटी गप्प बसणाऱ्यांत अगदी नामवंत महिलांचाही समावेश असतो आणि तोही प्रगत आणि उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या अमेरिकन समाजात, ही कटु वस्तुस्थिती संघर्षाच्या वास्तवात बदलणाऱ्या या मोहिमेने ज्यांच्या वाट्याला असे घृणास्पद अपमान आले, अशा स्त्रियांना 'मीही बळी ठरले होते' असे जाहीर बोलण्याचे बळ देते झाले. * अँड्रियाच्या लढ्यामागे उभे राहत जवळपास ६० महिलांनी आपल्या तक्रारी नोंदवल्या, तेव्हा झगमगाटी आणि प्रतिष्ठित आवरणाखाली चालणाऱ्या या लैंगिक शोषणाने किती व्यापक प्रमाणावर आणि खोलवर हातपाय पसरलेत आणि ते किती बेगुमान आहे हेच उघड झाले. अनेकांची नावे पाहून तर 'यू टू?' असे आश्चर्योद्गार बाहेर पडले.
 
== संदर्भ ==