"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''मी टू'''मी टू मोहीम ही चळवळ कोणत्याही अर्थात सर्व क्षेत्रांत, कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात प्रथम ट्विटरद्वारे #मीटू असा हॅशटॅग वापरून, आवाज उठवण्यासाठी सुरू झालेली मोहीम आहे. लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम आहे.
 
==मी टू मोहिमेची सुरुवात==
 
* ५ ऑक्टोबर २०१७ रोजी [[न्यूयॉर्क टाइम्स|न्यूयॉर्क टाइम्स]] (new York ) या वृत्तपत्रात ॲशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाली. ॲशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.nytimes.com/2017/10/05/us/harvey-weinstein-harassment-allegations.html|शीर्षक=Harvey Weinstein Paid Off Sexual Harassment Accusers for Decades|access-date=2018-10-22|language=en}}</ref> . हार्वे वेनस्स्टेईन यांनी प्लपपल्प फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा [[ऑस्कर पुरस्कार|ऑस्कर]] पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.imdb.com/name/nm0005544/|शीर्षक=Harvey Weinstein|संकेतस्थळ=IMDb|ॲक्सेसदिनांक=2018-10-22}}</ref>. न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रांत आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे याची त्याच्या द वेनस्टेईन कंपनी मधूनवेनस्टेईनमधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
 
* १२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसाईसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने ॲमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार ॲमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसाइईसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.hollywoodreporter.com/news/amazon-tv-producer-goes-public-harassment-claim-top-exec-roy-price-1048060|शीर्षक=Amazon TV Producer Goes Public With Harassment Claim Against Top Exec Roy Price (Exclusive)|work=The Hollywood Reporter|access-date=2018-10-22|language=en}}</ref>
 
* १६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने [[ट्विटर]] या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग (#) वापरला. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html|शीर्षक=Meet the woman who coined 'Me Too' 10 years ago — to help women of color|last=Ohlheiser|first=Abby|work=chicagotribune.com|access-date=20182019-1009-2225|language=en-US}}</ref>
 
* या नंतर अनेक [[अभिनेत्री]] आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू (#MeToo) वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.
 
* १८ ऑक्टोबर २०१७ ला ऑलिम्पिक जिमनॅस्टिक्स खेळाडू मॅकायला मरोनी हिने अमेरिकन जिम्नॅस्टिक्स टीमचे डॉक्टर लॅरी नासर यांच्या विरुद्ध लैंगिक शोषणाला वाचा फोडली. जवळपास ३० वर्षाहून अधिक काळ टीमचे डॉक्टर असरे नास्सरनासर सध्या बालकांच्या लैंगिक शोषणा संदर्भातील एका खटल्यात कारागृहात आहेत.
 
* २९ ऑक्टोबर २०१७ रोजी ॲन्थनी रॅप याने केव्हिन स्पेसी या ऑस्कर पारितोषिकप्राप्त अभिनेत्याविरुद्ध शोषणाचे आरोप केले. या नंतरनन्तर अनेक स्त्री तसेच बाल कलाकारांनी असेच आरोप केले आणि स्पेसी विरुद्ध जनमत तयार झाले.
 
* यानंतर अनेक व्यवसायांतील बड्या धनदांडग्यांनीधेंडानी केलेल्या लैंगिक शोषणाचा बळी ठरलेल्या स्त्री पुरुषांनी आवाज उठवला आणि अनेक प्रकरणात स्टुडिओ आणि कंपन्यांना अशा लोकांविरुद्ध कारवाई करावी लागली.
 
==मी टू ची निर्माती==
ओळ ५४:
[[राजकुमार हिरानी]] 'मुन्नाभाई' मालिकेला तिसरा चित्रपट बनवण्यात दंग आहेत.
 
बाकी आरोपींचे वकील रेंगाळत चाललेल्या कोर्टांच्या कारवायांनंतर आरोपींची सोडवणूक करण्याच्या बेतात आहेत. .
 
== 'मी टू' मोहीम सुरू करणाऱ्या महिलेवरच खटला ==
* लैंगिक शोषणाला वाचा फोडण्यासाठी जगभरात सुरू असलेली 'मी-टू' (#me too) ही मोहीम फ्रान्समध्ये सुरू करणं सँड्रा म्युलर या पत्रकार महिलेला महागात पडलं आहे.
* या प्रकरणी एका व्यक्तीनं सँड्रा म्युलर या पत्रकार महिलेवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
* तक्रारकर्त्यानं तिच्याकडं ५० हजार युरोंच्या नुकसानभरपाईचीही मागणी केली आहे.
* म्युलर हिनं गेल्या वर्षी १३ ऑक्टोबरला #balancetonporc असं लिहून एक ट्विट केलं होतं. वृत्तवाहिनीत तिच्यासोबत काम करणाऱ्या एरिक ब्रायन या सहकाऱ्यावर तिनं या ट्विटद्वारे काही आरोप केले होते.
* एरिकनं याबद्दल आपली जाहीर माफी मागितल्याचंही तिनं ट्विटमध्ये म्हटलं होतं. तिच्या ट्विटनंतर एरिकनं एका वृत्तपत्रात लेख लिहून म्युलरचे आरोप मान्य केले होते.
* म्युलरनंही ही लढाई अखेरपर्यंत लढण्याची तयारी केली आहे. या खटल्यामुळं लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर येईल. अशा प्रकारांचा सामना कसा करायचा, यावर व्यापक चर्चा झडेल, अशी आशा तिनं व्यक्त केली आहे.
* लैंगिक अत्याचारावर सडेतोड मत मांडल्याबद्दल 'टाइम्स' मासिकानं तिचा 'सायलेन्स ब्रेकर' म्हणून गौरव केला होता. तसंच, तिचा समावेश २०१७ च्या 'पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत केला होता.
 
 
== संदर्भ ==