"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३९:
 
== दलित पँथरमधील दिवस ==
[[चित्र:Arun Kamble with Dalai Lama.jpg|thumb|right|400px]]
 
[[चित्र:Arun Kamble with Govindrao Adik.JPG|thumb|right|400px]]
 
१९६८-७० या काळात ‘दलित पँथर्स’च्या सर्जनशील तरुणांनी जेव्हा तत्कालीन प्रस्थापित रिपब्लिकन नेतृत्वाला आणि त्याचबरोबर साहित्यातील सारस्वतांना सर्वंकष आव्हान दिले, तेव्हा अरुण कांबळे फक्त १५ वर्षांचे होते. त्या बंडाचा त्यांच्यावरचा संस्कार मात्र अगदी प्रखर होता. महाराष्ट्राच्या साहित्याचा आणि राजकारणाचा बाज कायमचा बदलून टाकण्याची जिद्द बाळगणाऱ्या पँथर्सना पहिल्या दशकातच आपल्या घट्ट रुतलेल्या हितसंबंधांच्या व्यवस्थेने विस्कळीत करून टाकले. आणीबाणीनंतर जनता पक्षाने आणि विशेषत: त्यांच्यातील समाजवादी मंडळींनी काही पँथर्सना जवळ केले. अरुण कांबळे तेव्हा पंचविशीत होते आणि त्यांच्याकडे दुर्दम्य आशावाद होता. आपण पँथर्सना पुन्हा तीच चित्त्याची झेप घ्यायला प्रवृत्त करू शकू, असा आत्मविश्वास त्यांच्याकडे होता. तसे पाहिले तर अरुण आणि ‘सीनिअर पँथर्स’ यांच्यात वयाचे फार अंतर होते असे नाही; पण तरीही विस्कळीत झालेले दलित नेते आणि साहित्यिक, राजकीय व सांस्कृतिक व्यासपीठावर तसे एकदिलाने एकत्र आले नाहीत. त्यानंतर काही महिन्यांतच [[मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन|मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर]] [[चित्र:Arun Kamble with S.S.Rege.jpg|thumb|right|400px]]
मात्र सर्व दलित नेते, त्यांचे समर्थक समाजवादी आणि कॉम्रेड्स एकत्र आले आणि त्या चळवळीने अरुण कांबळे यांच्या दलित एकजुटीबद्दलच्या आशा पुन्हा पल्लवीत केल्या.