"बाळाजी बाजीराव पेशवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४४:
बाळाजी बाजीरावांचा जन्म ८ डिसेंबर १७२० रोजी [[पुणे]] येथे झाला. [[थोरले बाजीराव पेशवे]] हे त्यांचे वडील. लहानपणापासूनच बाळाजी बाजीरावांना घरातील लोक व खुद्द छत्रपती '''नानासाहेब''' म्हणून बोलवू लागले. छत्रपतींची त्यांच्यावर मर्जी होती. थोरल्या बाजीरावांच्या निधनानंतर शाहू छत्रपतींनी पेशवाईची वस्त्रे नानासाहेबांना दिली. बाळाजी बाजीरावांनी त्यांच्या पूर्वीच्या दोन पेशव्यांसारखेच [[मराठा]] छत्रपतींच्या संमतीने साम्राज्यवादी धोरण अवलंबिले. शाहू छत्रपतींनी मराठा राज्याची सर्व कायदेशीर व प्रत्यक्ष कारभाराची सूत्रे त्यांच्याकडे सोपवली व स्वतः मराठा साम्राज्याचे नामधारी प्रमुख राहिले. इ.स. १७४९ साली शाहू छत्रपतींचा मृत्यू झाल्यानंतर बाळाजी मराठा राज्याचा सर्वसत्ताधीश झाला. शाहूचा वारस रामराजा हा [[सातारा]] येथे नामधारी छत्रपती म्हणून छत्रपतीच्या गादीवर होता तरीही बाळाजीने छत्रपतीच्या विशेष राजकीय हक्कांचा वापर सुरू केला.{{संदर्भ हवा}} त्यामुळे पेशवे व रामराजे यांच्यात दिनांक [[२५ सप्टेंबर]], [[इ.स. १७५०]] रोजी [[सांगोला]] येथे करार झाला. त्यानुसार पेशव्यांनी छत्रपतींच्या नावे दौलतीचा कारभार करावा असे ठरले. बाळाजी बाजीरावाने छत्रपतींना दरसाल पासष्ट लाख रुपये द्यावेत असेही या करारान्वये ठरले.
== राघोजी भोसल्यांचा ओडिशा विस्तार आणि पेशव्यांविरुद्ध विद्रोह==
नानासाहेबांच्या सुरुवातीच्या काळात [[राघोजी भोसले]] यांनी पुर्व हिंदुस्थानात मराठी राज्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले. पण त्यांचे पेशव्यांशी संबंध काही ठिक नव्हते. नानासाहेबांना पेशवाई देण्याच्या काही दिवस अगोदर राघोजींनी आपली एक फौज [[तंजावुरचे मराठा राज्य|तंजावूरच्या प्रतापसिंगांना]] मदत म्हणून दक्षिणेत पाठवली होती. तेथे [[दोस्त अली दोस्त खान]]ला संपवून राघोजींनी [[अर्काटचे राज्य|अर्काट राज्याच्या गादीवर]] [[सफदर अली खान]]ला बसविले.
 
==समाधी==