"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ९०:
कालिया नागाला कृष्णाने धडा शिकवला. भारतीय युद्धात कृष्ण [[पांडव|पांडवांच्या]] बाजूने लढला. [[महाभारत|महाभारतात]] म्हटले आहे की, कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा किंवा [[क्षत्रिय]] नाही. ( म. भा. ३८.८.) हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्णलीला व कृष्णनीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्युसमयी वय एकशेआठ वर्षे होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर [[राजसूय यज्ञ|राजसूय यज्ञात]] पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली.
 
==देव कोणतेही काम करीत नाही==
===गीता===
लोक विचारतात, जर श्रीकृष्ण स्वत:ला देवाचा अवतार मानत होता, तर त्याने शिशुपालाला मारले जसे महाभारत युद्धात उतरलेल्या सर्व कौरव सैन्याला आणि जगातील सर्व वाईट प्रवृत्तीच्या लोकांना मारून का टाकले नाही? तर उत्तर असे आहे की, देव स्वत: काही काम करीत नाही, फारतर तो काम करणाऱ्याचा साथीदार असतो. मुलांनी चांगला अभ्यास केला नाही तर त्यांना परीक्षेत चांगले मार्क मिळवून द्यायला देवाची प्रार्थना उपयोगी पडत नाही. देव फारतर अभ्यास करणाऱ्या मुलाच्या बरोबर बसेल आणि त्याला मदत करेल. व्यायाम न करता फक्त देवाची पूजाअर्चा करून आणि देवाच्या विनवण्या करून चांगले आरोग्य मिळणार नाही, त्यासाठी व्यायामच करायला हवा. समृद्धी मिळवण्यासाठी धार्मिक पूजापाठ, आरत्या उपयोगी पडत नाहीत, त्यासाठी माणसाने स्वत: करीत असलेले काम मन लावून उत्तम रीतीने केले पाहिजे. पायाभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून आणि निव्वळ देवाचा जप करून माणसाच्या क्षमतेत भर पडत नाही. देव अशाच लोकांना मदत करतो जे स्वत:ला मदत करतात.
 
===गीता===
महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्‌गीता सांगितली. यात [[आत्मा|आत्म्याचे]] अविनाशी असण्याचे [[तत्त्वज्ञान]] सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ([[मोक्षदा एकादशी]]) हा दिवस [[गीता जयंती]] म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्‍न, कष्ट, काम म्हणजेच [[कर्म]] केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही. ज्ञानी माणसालाही ती सुटत नाहीत. म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी कर्म केले पाहिजे. कामासाठी कोणतीही लाचलुचपत, भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा हाच संदेश गीतेने दिला आहे. [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] मंडालेच्या तुरुंगात असताना गीतेचा अभ्यास करून, [[गीतारहस्य]] हा ग्रंथ लिहिला.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले