"पुणे जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७७ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
अखिल विश्वासाठी पसायदान मागणार्‍या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करून सांगणार्‍याया [[संत ज्ञानेश्वर]] महाराजांची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे. साध्या-सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान गाथेतील अभंगांच्या माध्यमातून अतिशय सुगम भाषेत सांगणार्‍या [[संत तुकाराम|संत तुकारामांची]], पुणे जिल्हा ही जन्मभूमी व कर्मभूमी होती. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
 
संत ज्ञानेश्वरांचीज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आणि संत तुकारामांचातुकाराम महाराजांचा जन्म व त्यांची साधना यांमुळे पुणे जिल्हा, हा महाराष्ट्रासाठी आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक सात्त्विक व पवित्र ऊर्जा केंद्रच आहे. दर आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी ज्ञानोबा-तुकारामाच्या नावांच्या पालख्या लाखो वारकर्‍यांसह ह्याच जिल्ह्यातील देहू-आळंदीतून प्रस्थान करतात.
 
शिवाजीच्याशिवाजी महाराजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहिले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणार्‍या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या शहरात व जिल्ह्यात उद्योगांचा पायाही तेवढाच भक्कम आहे. एवढेच नव्हे तर पुणे हे लष्करीदृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे.
 
पुणे तिथे काय उणे असे गमतीने किंवा उपरोधानेही म्हटले जाते. परंतु पुणे शहराचा व जिल्ह्याचा सर्वांगीण विकास पाहता ते खरेच असल्याचे दिसून येते. प्रामुख्याने शिक्षणाचे, माहिती तंत्रज्ञान व अन्य उद्योगांचे देशातील मुख्य केंद्र म्हणून पुणे जिल्हा हा जोमाने वाटचाल करत आहे. पुणे शहरातील विविध स्वयंसेवी संस्था प्रसिद्ध आहे.
 
== ऐतिहासिक महत्त्वाचे ==
४६

संपादने