"दूध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३:
'''दूध''' एक अपारदर्शक पांढरा द्रव आहे जो [[सस्तन]] प्राण्याच्या [[मादी]]च्या [[स्तन|स्तनांतून]] स्त्रवणारा एक [[पांढरा]] [[द्रव]] पदार्थ आहे. नवजात अर्भकासाठी दूध हे पोषक [[अन्न]] आहे.नवजात दूध इतर पदार्थांचे सेवन करण्यास अक्षम होईपर्यंत ते दुधावर अवलंबून असते. साधारणत: दुधात ७४ टक्के पाणी असते आणि उर्वरित भागात घन घटक असतात म्हणजेच खनिजे आणि चरबी असतात. गाय व म्हशी व्यतिरिक्त विविध कंपन्यांचे पॅकेज्ड दूधही बाजारात उपलब्ध आहे. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि राइबोफ्लेविन (व्हिटॅमिन बी -२) तत्त्व असते , त्याशिवाय फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयोडीन आणि जीवनसत्त्वे अ, डी, के आणि ई यासह अनेक खनिजे आणि चरबी आणि ऊर्जा असते. याव्यतिरिक्त, त्यात बरीच सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य आणि काही जिवंत रक्तपेशी असू शकतात.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-08-06|title=दूध|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7&oldid=4269496|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref>
 
दूध हे आपल्या आहाराचा मुख्य घटक आहे. पूर्वीच्या काळापासून भारतीय संस्कृतीत दुधाला महत्त्व आहेदिले जाते. दूध व दुधाचे पदार्थ हे सर्व पूजा-अर्चाना, नैवेद्य यात वापरले जातात. आहारशास्त्रात दूध व दुधाच्या पदार्थाना ‘संपूर्ण आहार’ असे म्हणतात. याचे कारण असे की, नवजात शिशू आपल्या आयुष्याचे पहिले सहा महिने फक्त दुधावरच अवलंबून असतो. दूध व दुधाचे पदार्थ शाकाहारी अन्नातील मुख्य घटक आहेत. दुधात प्रथिनांचे प्रमाण जास्त आहे. यातील प्रथिने डाळी, कडधान्ये यांच्यातील प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाची असतात. शाकाहारी अन्नात प्रथिनांचे प्रमाण फार कमी असते. त्यामुळे दूध व त्याचे पदार्थ ही उणीव भरून काढतात. दुधातील प्रथिने उच्च दर्जाची असल्यामुळे शरीराची वाढ, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर दुधात कॅल्शियम व डी जीवनसत्त्व असते. दुधामधील कॅल्शियमचा आपल्या हाडांना खूप फायदा होतो. दुधामध्ये लॅक्टोज नावाची साखर-कबरेदकेकर्बोदके असतात. या साखरेमुळे दुधाला गोडी येते. साखर न घालता दूध घेतले तरीही त्याला एक नैसर्गिक गोडवा असतो. हा गोडवा लॅक्टोजमुळे येतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://prahaar.in/%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%a6%e0%a5%81/|शीर्षक=पौष्टिक आणि स्वादिष्ट दुधाचे विविध पदार्थ {{!}}|last=Sarvanje|पहिले नाव=Vinayak|भाषा=en-US|अॅक्सेसदिनांक=2019-09-12}}</ref>
 
दुधामधील केसीनरेणूबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचे रेणू बद्ध असल्याने केसीनच्या अन्ननलिकेतील पचनाबरोबर कॅल्शियम फॉस्फेटचेसुद्धा शोषण होते. दूध हा आपल्या आहारातील महत्त्वाचा कॅल्शियमचा स्रोत बनला आहे. दुधामधील प्रथिने आणि मेदाम्लामुळे लहान मुलांचे पोषण होते. लॅक्टोज या दुधातील शर्करेचे काहीं बालकामध्ये विकराच्या अभावामुळे पचन होत नाही. अशा बालकाना दुधाऐवजी सोयाबीनपासून बनवलेले ‘दूध’ दिले जाते. दूध हे पूर्ण अन्न आहे ही समजूत पूर्णपणे खरी नाही. दुधामध्ये लोह नसते. त्यामुळे केवळ दुधावर अवलंबून असलेल्या बालकामध्ये लोहाची कमतरता आढळते. {{संदर्भ हवा}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दूध" पासून हुडकले