"माधव आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Migrating 3 langlinks, now provided by Wikidata on d:Q3521062
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''माधवराव लक्ष्मणराव आपटे''' (मृत्यू : मुंबई , २३ सप्टेंबर २०१९) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू होते. ते भारताकडून सात कसोटी सामने खेळले.
 
माधव आपटे यांची पहिल्या दर्जाच्या क्रिकेट सामन्यांत खेळायची सुरुवात मुंबई संघातून झाली. या वेळी त्यांनी रणजी सामन्यात सौराष्ट्राविरुद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर १९५२-५३ या काळात ते सात कसोटी सामने खेळले. त्यांतले दोन कसोटी सामने पाकिस्तानविरुद्ध होते. उरलेल्या पाच सामन्यांत त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध एक शतक आणि काही अर्धशतकांसह ५१.११ च्या सरासरीने ४६० धावा केल्या होत्या. वेस्ट इंडीजच्या गोलदांजांची धुलाई करत माधव आपटे यांनी १६३ धावांची खेळी केली. पाॅली उमरीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे ते तत्कालीन विक्रमी फलंदाज ठरले होते. हा विक्रम १८ वर्ष त्यांच्या नावावर होता.
 
या दौऱ्यानंतर आपटे यांना पुन्हा भारतीय क्रिकेट संघात घेतले नाही. दरम्यान, अन्य प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांमध्ये खेळताना त्यांनी ६७ सामन्यात ३३३६ धावा केल्या. यांत त्यांची सहा शतके आहेत.
 
पुढील आयुष्यात त्यांनी त्यांनी उदयोन्मुख खेळाडूंना घडवण्याचे काम केले. त्याच सुमारास ते क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCIचे) अध्यक्ष झाले.
 
ते काही काळ मुंबईचे नगरपालही होते.
 
==उद्योजक माधवराव आपटे==
 
==आत्मचरित्र==
माधवराव आपट्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे, त्याचे नाव -
* As Luck would Have It' (इंग्रजी)
 
 
{{Stub-भारतीय क्रिकेटपटू}}
"https://mr.wikipedia.org/wiki/माधव_आपटे" पासून हुडकले