"ग्रंथालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ ३२:
 
== महाराष्ट्रातील ग्रंथालये ==
पारंपरिक ग्रंथालयांमध्ये देखील काही एक समाजघटकांचा वरचष्मा असे, त्यामुळेच समाजातील सर्व घटकांसाठी म्हणून सुरुवात झाली ती नेटिव्ह जनरल लायब्ररीची. १८२८ पासून महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अशी अनेक ग्रंथालये उभी राहली. पहिले ग्रंथालय १८२८ साली रत्‍नागिरी येथे स्थापन झाले. हे ग्रंथालय ब्रिटिश आमदानीत काही कारणास्तव ब्रिटिशांनी काही काळ बंद केल्यामुळे स्थापनेचे काही संदर्भ नष्ट झाले, पण गॅझेटमधील नोंद आढळते. त्यापाठोपाठ सुरू झालेले ग्रंथालय म्हणजे अहमदनगर येथील १८३८ साली कर्नल पी.टी. फ्रेंच यांनी स्थापलेली नेटिव्ह जनरल लायब्ररी. त्यानंतर नाशिक येथे १८४० साली ग्रंथालय सुरू झाले. महाराष्ट्रात नाशिक येथे स्थापन झालेल्या सार्वजनिक ग्रंथालयाला एक वेगळा इतिहास आणि परंपरा लाभलेली आहे. या ग्रंथाच्या कार्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिश अधिकाऱ्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. काही ख्रिश्चन मिशनरी व नाशिक मधील वाचनप्रेमी यांनी एकत्र येऊन या ग्रंथालयाची योजना प्रत्यक्षात आणली. 1840 हा काळ म्हणजे भारतात नुकत्याच पाश्चात्त्य शिक्षणाची झालेली सुरुवात होती. अशा या काळामध्ये या ग्रंथालयांचे योगदान सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. या ग्रंथालयांनी या काळामध्ये शिक्षण चळवळीला मोठी चालना दिली. काहींच्या मते अहमदनगर हे महाराष्ट्रातील पहिले सार्वजनिक ग्रंथालय आहे. पण सरकारी यादीनुसार रत्‍नागिरीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पाहता पाहता महाराष्ट्राच्या गावोगावी ही चळवळ फोफावत गेली. संस्थानिकांनी या कामी मोलाची मदत केलेली आढळते. इचलकरंजी, सातारा, कुरुंदवाड, सांगली, फलटण अशी काही यातील उदाहरणे. ब्रह्मपुरी, राजगुरूनगर, अमरावती, इचलकरंजी, दादर, ठाणे इत्यादी ठिकाणी ज्ञानपिपासू व्यक्तींनी पदरमोड करीत ग्रंथालये स्थापन केली. बहुंताश ग्रंथालय नेटिव्ह जनरल याच नावाने सुरू होऊन कालांतराने नगर/सार्वजनिक वाचनालय म्हणून रूपांतरित झाली आहेत. काही ठिकाणी धनिक ग्रंथप्रेमींच्या मदतीला स्मरून त्याचे नाव ग्रंथालयास दिलेले आढळते, तर कोठे वाचनालयासाठी अपार मेहनत घेतली अशांची नावे ग्रंथालयास दिली आहेत (उदा. आपटे वाचन मंदिर, इचलकरंजी). नेटिव्ह जनरलमध्ये बर्‍याच वेळा इंग्रजी साहित्याचा वरचष्मादेखील राहिला आहे. म्हणूनच मराठी भाषा व मराठी ग्रंथांच्या संवर्धनासाठी म्हणून ठाणे व मुंबई येथे मराठी ग्रंथसंग्रहालये स्थापली गेली. {{संदर्भ हवा}}
 
महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘गाव तेथे ग्रंथालय' असावे, असे मत व्यक्त केले.{{संदर्भ हवा}} महाराष्ट्रात सार्वजनिक ग्रंथालयांची उपयुक्तता ध्यानात घेऊन १९६७ साली 'महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम' हा कायदा अमलात आला. महाराष्ट्रात मान्यताप्राप्त ग्रंथालय संघांना ग्रंथालय संचालनालयामार्फत अनुदान देण्यात येते. शंभर वर्षांची यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली महाराष्ट्रात तब्बल ८३ ग्रंथालये आहेत, तर इतर सुमारे ९ हजारांहून अधिक शासनमान्य ग्रंथालये आहेत. राज्यात एकूण १२,८६१ ग्रंथालये आहेत. महाराष्ट्रामधील ७५ टक्क्यांहून अधिक गावांत ग्रंथालये नाहीत.
"https://mr.wikipedia.org/wiki/ग्रंथालय" पासून हुडकले