"अरुण कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०:
अरुण कांबळे यांनी आपली भीमगर्जना मात्र कायम चालूच ठेवली होती. ती गर्जना महाराष्ट्रव्यापी झाली ती ‘रामायणातील संस्कृतीसंघर्ष’ या कांबळेंच्या प्रबंधरूपी पुस्तकामुळे. त्यांच्या व्यासंगाचा पुरावा म्हणजे त्यांनी जेव्हा याविषयीचे लेखन केले तेव्हा डॉ. आंबेडकरांचा ‘रिडल्स इन हिंदुइझम्’ हा ग्रंथ कांबळेंनी वाचलाही नव्हता. कांबळे यांचे ते लेखन १९८२ सालचे. तो वाद वेगळ्या स्वरूपात पुन्हा १९८७ भडकून उठला होता. खरे म्हणजे, आपल्या राजकारणाचे आधुनिक रामायण सुरू झाले ते रथयात्रेनंतर म्हणजे १९९० सालापासून; परंतु राम आणि कृष्ण आपल्या सांस्कृतिक राजकारणात १९८२ पासूनच लुडबुड करू लागले होते. असेही म्हणता येईल की भारतीय राजकारणात ‘रामराज्य’ येणार आणि सर्व विचारसरणींमध्ये उलथापालथ होणार याचा अंदाज कांबळेंना अगोदरच लागला असावा. विजय तेंडुलकरांनी अरुण कांबळेंमधील ‘व्यासंगी बंडखोरी’ पूर्वीच ओळखली होती. त्यांनी ‘रामायणातील संस्कृती संघर्ष’ या पुस्तकावर टिप्पणी करताना म्हटले होते, ‘‘या छोटेखानी पण वैचारिक पुस्तकाचे मी स्वागत करतो. मराठीत जेव्हा विद्वत्ता सिद्ध करायची असते तेव्हा ४०० ते ५०० पानांचा ग्रंथ लिहावा लागतो. रामायणावर तर तो हजार पानांचाही होऊ शकला असता; पण अरुण कांबळे यांनी ते केवळ ७०-७५ पानांत सिद्ध केले आहे. या पुस्तकाच्या परिच्छेदा-परिच्छेदातून संशोधनाची तळमळ असल्याचे दिसून येते. एकही वाक्य निराधार नाही.. आणि आवेश आहे; पण तो मैदानी किंवा सनसनाटी माजविण्यासाठी आलेला नाही.. हे पुस्तक हा एक सत्याचा शोध आहे आणि तसा शोध ज्या समाजात होत नाही तो समाज मेलेला असतो. अरुण कांबळे यांच्यासारखी माणसे या समाजाची आशास्थाने आहेत.’’
 
[[चित्र:Arun Kamble with Magesh Padgaonkar.JPG|thumb|right|500px400px|अरुण कांबळे यांच्याबरोबर [[मंगेश पाडगावकर]]]]
ह्या एकूण रगाड्यात सांगलीची असलेली नाळ मात्र त्यांनी कधीच तुटू दिली नाही. मातोश्री शांताबाईंच्या [[माज्या जल्माची चित्तरकथा]] या पुस्तकाचे तसेच [[मी कृष्णा]] या त्यांच्या वडिलांच्या आत्मकथनाचे प्रकाशन त्यांनी केले होते. प्रा. अरुण कांबळे यांनी महाराष्ट्रातील साहित्याला आणि राजकारणाला जातीयतेचा जो करकचून विळखा पडला आहे, तो आपल्या हयातीत निदान सैल व्हावा आणि शक्यतो पिढ्या-दोन पिढ्यांच्या येत्या काळात ही विषमता पूर्णपणे दूर व्हावी म्हणून अथकपणे प्रयत्न करणार एक व्यक्तिमत्त्व.केवळ उग्र आंदोलन, प्रक्षोभक कविता आणि स्फोटक भाषणे करून लोकांचे वैचारिक प्रबोधन होत नाही हे अरुणने जाणले होते. त्यांच्या व्यासंगाला धार होती ती परिवर्तनाच्या तीव्र इच्छेची. परंतु महाराष्ट्राला अशीच ‘निवांत विचारवंतां’ची एक दीर्घ परंपरा आहे.