"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: सुचालन साचे काढले अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ ४५:
 
==इतिहास==
संगमनेर गावाला सुमारे २३०० वर्षांचा इतिहास आहे. सातवाहन राजवटीपासून संगमनेर गाव अस्तित्वात असल्याचे मानले जाते. सातवाहन राजवट ते आधुनिक संगमनेर हा सुमारे २३०० वर्षांचा प्रवास डॉ. संतोष खेडलेकर यांनी ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात मांडला आहे. सन २०११ साली हे पुस्तक प्रकाशित झाले. यात संगमनेरचे वेगवेगळ्या काळातील राज्यकर्ते, इथे घडलेल्या घटना घडामोडी, स्वातंत्र्य संग्राम, तत्कालीन थोर व्यक्तीमत्वांच्या संगमनेर भेटीचा वृतांत, नगरपालिकेची स्थापना, संगमनेर गावाला आधुनिक स्वरूप येतानाच्या काळातील घडामोडी, इथे आलेले महापूर आणि नैसर्गिक आपत्ती अशा अनेक गोष्टींचा परामर्श ' गोष्ट एका गावाची ' या पुस्तकात घेण्यात आलेला आहे.
 
१७९० साली संगमनेर हे ११ परगण्यांचे मुख्यालय होते.
 
Line ६९ ⟶ ७१:
 
===इतर इतिहास===
'''कला आणि साहित्यिक वारसा लाभलेले संगमनेर''' - कला, साहित्य, संस्कृती, शिक्षण, सहकार अशी काही वैशिष्ट्ये असलेल्या संगमनेर शहराला मोठा साहित्यिक वारसा {{बदल}}
{{बदल}}
लाभलेला आहे. कवी अनंत फंदी हे संगमनेरचे पहिले ज्ञात साहित्यिक. त्यांनी लावण्या, विविध कवणे लिहिली पण त्यांची खरी ओळख म्हणजे त्यांनी महाराष्ट्राला ' फटका ' या काव्यप्रकाराची ओळख करून दिली. समाजातील अपप्रवृत्ती, चुकीच्या गोष्टींवर त्यांनी आपल्या फटका या काव्यप्रकारातून शाब्दिक प्रहार केले. बिकट वाट वहिवाट नसावी हा त्यांचा अक्षरफटका म्हणजे मराठी काव्यक्षेत्रातील अनमोल रत्न आहे. त्यांनी श्री माधवग्रंथ नावाचा ओवीबद्ध ग्रंथही लिहिला आहे. त्यांच्याच नावाने येथील संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने ' कवी अनंत फंदी साहित्य ' पुरस्कार दिला जातो. अतिशय पारदर्शकपणे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा राज्यात मोठा लौकिक आहे. महत्वाचे म्हणजे कुणाही एका व्यक्ती किंवा संस्थेचे आर्थिक प्रायोजकत्व न घेता लोकसहभागातून दिला जाणारा हा राज्यातील एकमेव साहित्य पुरस्कार आहे.
संगमनेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्लम याचा इ.स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. [[निजामशाही]]त (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ.स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लांचीही येथे स्मारके आहेत.
 
कवी नरहरसा संगमनेरकर यांनी अवघ्या मराठी मुलखात आपल्या शीघ्र कवित्वाने अधिराज्य गाजवले. यांचा जन्म किंवा मृत्यू याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही मात्र त्यांच्या काव्य रचनेवर खुश होऊन लोकमान्य टिळक, बालगंधर्व, शि. म. परांजपे, संगीतसूर्य केशवराव भोसले आदी मान्यवरांनी दिलेली पत्रे संगमनेर इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध आहेत.
 
याखेरीज नारायण गंधे, रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे, मा. रा. लामखडे, पोपट सातपुते, डॉ. संतोष खेडलेकर, नीलिमा क्षत्रिय, डॉ. संजय मालपाणी यांनी संगमनेरच्या साहित्य विश्वात मोलाची भर घातली आहे.
 
 
संगमनेरनेर : शहराचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही. मध्ययुगात येथे देवगिरीच्या यादव घराण्याची सत्ता होती. दुसरा भिल्लम याचा इ.स. १००० मधील ताम्रपट येथे सापडला आहे. [[निजामशाही]]त (१४९०-१६३६) व त्यानंतर हे शहर मोगलांच्या आधिपत्याखाली होते. शहराच्या पूर्व भागातील ख्वाजा मुहम्मद सादिक यांच्या घुमटाकार कबरीवर फार्सी भाषेतील दोन कोरीव लेख असून ते इ.स. १६५९ मधील आहेत; तसेच येथील एका मशिदीमध्ये १७०७-०८ सालातील एक अस्पष्ट कोरीव लेख सापडला आहे. मोगल व छ. शिवाजी महाराज यांच्या १६७९ मधील संगामात महाराजांचा सेनापती सिधोजी निंबाळकर येथे धारातीर्थी पडला. शहराच्या दक्षिणेस पुणे-नासिक मार्गा-लगत ‘हनुमंत नाईक बारी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या खिंडीमध्ये एक स्मृतिस्तंभ असून तो हनुमंत नाईक या भिल्ल प्रमुखाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला आहे. भिल्लांच्या हक्कांसाठी त्याने बाळाजी बाजीराव पेशव्यांबरोबर अयशस्वी लढा दिला होता व त्यात त्याला येथे गोळी लागली. अन्य भिल्लांचीही येथे स्मारके आहेत.
 
[[पेशवाई]]तील प्रसिद्ध [[साडेतीन शहाणे|साडेतीन शहाण्यां]]पैकी [[विठ्ठल सुंदर परशरामी]], याशिवाय शाहीर [[अनंत फंदी]] (१७४४-१८१९) हे संगमनेरचे रहिवासी होते. त्यांच्या नावे दरवर्षी 'अनंत फंदी व्याख्यानमालेचे' आयोजन करण्यात येते. या व्याख्यानमालेचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यल्प शुल्क घेऊन ही व्याख्यानमाला चालवली जाते. १९७८ पासून अथकपणे ही व्याख्यानमाला सुरू आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले