"लिओनार्दो दा विंची" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
तो चे ते केले
ओळ २९:
लिओनार्दो त्याच्या आईवडिलांचे अनौरस अपत्य होता. जन्मानंतर त्याचा सांभाळ ५ वर्षे आईनेच केला. त्यानंतर मात्र त्याच्या वडिलांनी त्याचा सांभाळ करायची तयारी दर्शविली व याचवेळी त्याच्या आईचेही लग्न ठरले. अशात लिओनार्दो त्याच्या वडिलांकडे फ्लॉरेन्सला आला. त्याचे वडील सधन होते. लिओनार्दोच्या शिक्षणाकडे , देखभालीकडे त्यांनी योग्य लक्ष पुरवले. त्याची कलेतील आवड लक्षात घेऊन त्याला व्हेरोशिओ या प्रसिद्ध् चित्रकाराकडे शिक्षणासाठी पाठवले. चित्रकला, शिल्पकला अशा शास्त्रांचा अभ्यास त्याने व्हेरोशिओकडे केला. याचवेळी त्याने स्वत:हून इतर शाखांचाही अभ्यास चालू ठेवला.
 
लिओनार्दो दा व्हि्न्ची हे प्रबोधनयुगातील अष्टपैलू व्यक्तीमत्त्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला,स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचे प्रभुत्व असले तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्यांच्या मोनालिसा व द लास्ट सफर या चित्राकृती अजरामर ठरल्यातेअनेक
 
== मिलान ला प्रयाण ==