"भाऊराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५९:
कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे.कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले. कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर 1887 रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे [[प्राथमिक शिक्षण]] [[सांगली]] जिल्ह्यातील [[विटा]] आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या [[राजाराम हायस्कूल]]मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय [[जैन बोर्डिंग]]मध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.कर्मवीरांच्या गावी कुंभोज मध्ये 'सत्त्यापाचे बंड'हे प्रकरण खोप गाजले होते.कुंपणाच्या
 
काट्या तोडणार्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले.सत्त्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला.रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले.व तो फारारी झाला.तो कार्मावीर अण्णाच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला.छोट्या भाऊरावाना तो अंगाखांद्यावर खेळवी.तोकर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगे.बंडखोरी,'अन्यायाविरुद्ध चीड हे सदगुण सत्त्याप्पाकडून कर्मवीरांना मिळाले.त्यंच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भारता येत नसे.
 
इतरांकडून मागून पाणी घ्यावे लागे.पाण्यासाठी तासनतास विनवणी करावी लागे. एकदा ते दृष्यपाहून अण्णाचेहृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी राहाठ मोडून आडात टाकला.
'''शिक्षण संस्था -'''
 
=== शिक्षण संस्था - ===