"जैन धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ १:
'''जैन धर्म''' हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन भारतीय धर्म असून त्याचे पुनरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेनरुप व वैदीक परंपरेसारखा प्राचीन आहे, हे पुराव्याने सिद्ध झाले आहे जैन धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आलेला असून तो आता एक स्वतंत्र धर्म आहे. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. 'जगा आणि जगू द्या' या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करणार आहे. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादा मधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम हे महावीरांनी केलं. ते जैन धर्मातील चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचं काम त्यांच्या काळामध्ये झालं. जैन धर्माला काही प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केलेला होता.
{{संदर्भ हवा}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/जैन_धर्म" पासून हुडकले