"ठेचा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''ठेचा''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] एक [[खाद्यपदार्थ]] आहे. अतितिखट हिरव्या मिरच्या ठेचून जी चटणी बनते तिला (मिरच्यांचा) ठेचा म्हणतात. हा नेहमीच्या दाणे-खोबरे घालून केलेल्या चटण्यांपेक्षा खूप अधिक तिखट असतो, त्यामुळे बेताबातानेच चाखावा लागतो.
==साहित्य==
#हिरव्या मिरच्या- जाड - पाव किलो
#लसूण - १ गड्डा (तिखट जास्त हवे असल्यास २ गड्डे)
#दाण्याचा कूट १ चमचा
# कोथिंबीर
# मीठ - चवीनुसार
 
==पुर्व तयारी==
 
==कृती==
प्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. त्यानंतर हिरव्या मिरच्या तव्यावर किंवा कढईत भाजून घ्याव्यात. भाजताना त्यावर अर्धा चमचा तेल सोडावे. मिरच्या पांढऱ्या होत आल्या नंतर लगेच खलांत टाकाव्यात. (काळपट होईपर्यंत भाजू नयेत).
 
त्याबरोबर १ गड्डा सोललेल्या लसणाच्या पाकळ्या घ्याव्यात. चवीनुसार मीठ बरोबर घेऊन खलबत्त्यात चांगल्या ठेचाव्यात. लसूण व मिरच्या चांगल्या एकजीव होई पर्यंत ठेचल्यावर एका वाडग्यात काढून त्यावर १ चमचा दाण्याचा कूट व बारीक चिरलेली कोथिंबिर टाकून परत एकजीव करणे.
 
==सजावट==
 
==इतर माहिती==
अधिक टीपा: १. ठेच्याला मिरच्या जाड, लांब व पोपटी रंगाच्या मिळाल्यास उत्तम (काळपट हिरव्या नकोत). २. मिरच्या गरम असतानाच ठेचायला घ्याव्यात. तिखटाची मात्रा लसणाने कमी/जास्त करावी. ठेचताना थेंबभर तेल अधून मधून वरून सोडत राहिल्यास ठेचा चवीला सुंदर होतो तसेच ठेचायला सोपा जातो. ३. ठेचणे हा प्रकार मन लावून करावा - मिक्सर मधील ठेच्याला चव येत नाही{{संदर्भ हवा}}. - लाकडी बडगी व ठेचणी असल्यास उत्तम. ४. दशम्या, भाकरी, ठेपला, पोळी तत्सम कुठल्याही पदार्थाबरोबर छान लागतो. ५. प्रमाणात सेवन करणे;.
==बाह्य दुवे==
 
ठेचा [[मिरची]], [[चिंच]] व [[मीठ|मीठापासून]] तयार केला जातो.
 
{{विस्तार}}
 
[[वर्ग:महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ठेचा" पासून हुडकले