"भाऊराव पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५७:
== चरित्र ==
[[चित्र:Dr Babasaheb Ambedkar with Karmaveer Bhaurao Patil (left) and Sant Gadge Maharaj (center) in July 14, 1949.jpg|thumb|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] व [[गाडगे महाराज]] यांच्यासोबत भाऊराव पाटिल, १४ जुलै १९४९]]
कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा [[जन्म]] [[कोल्हापूर]] जिल्ह्यातील [[कुंभोज]] या गावी जैन कुटुंबात झाला. [[सांगली]] जिल्ह्यातील [[ऐतवडे बुद्रुक]] हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांचे पूर्वज कोल्हापूरजवळील जैन नादणी मठाचे भट्टारक पट्टाचार्य. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे [[प्राथमिक शिक्षण]] [[सांगली]] जिल्ह्यातील [[विटा]] आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या [[राजाराम हायस्कूल]]मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय [[जैन बोर्डिंग]]मध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.
 
=== रयत शिक्षण संस्था ===