"चोखामेळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[File:Pandharpur Vithoba temple.jpg|thumb|पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या द्वाराजवळ असलेली चोखामेळा यांची समाधी तथा मंदिर]]
 
'''संत चोखामेळा''' (चोखोबा) (जन्म:अज्ञात वर्ष - मृत्यू: [[इ.स. १३३८]]) हे [[यादव काळ|यादव काळातील]] [[नामदेव|नामदेवांच्या]] संतमेळ्यातील [[वारकरी]] संतकवी होते. चोखोबांचा जन्म [[विदर्भ]]ातील [[बुलढाणा]] जिल्ह्यात [[देऊळगाव राजा]] तालुक्यातील मेहुणा किंवा मेहुणपुरी या गावी झाला. संत चोखामेळांचे कुटुंब हे जातीने [[महार]] होते.<ref>http://hi.krishnakosh.org/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE</ref><ref>http://m.livehindustan.com/news/article/article1--%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE--59401.html</ref> (चोखोबांचा जन्म [[पंढरपूर]]ला झाल्याचे [[महिपती ताहराबादकर|संत महिपती]] सांगतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| दुवा =
| दुवा =http://www.marathisrushti.com/people/index.php?lang=marathi&article=9030 ritik
| शीर्षक =चोखामेळा (चोखोबा)
| भाषा = मराठी
ओळ १३:
| ॲक्सेसदिनांक = १० मे, २०१२
| अवतरण = संत चोखामेळा यांचा इ.स. १३३८ साली पंढरपूरला मृत्यू झाला.
}}</ref>) चोखोबा मूळ वर्‍हाडातीलवऱ्हाडातील आहेत असेही म्हटले जाते. त्यांची पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा वंकाबंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व गुणसंकीर्तन करीत होते. <ref>{{स्रोत पुस्तक|title=संतवाङ्मयाची सामाजिक फलश्रुती|last=सरदार|first=गंगाधर बाळ्कृष्ण|publisher=श्रीविद्या प्रकाशन|year=१९८२|location=पुणे|pages=७१}}</ref> त्यांचा मृत्यू गावकुसाच्या कामात दरड कोसळून झाल्याचे सांगितले जाते. त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडांतून विठ्ठल नामाचा गजर ऐकू येत होता, यावरून नामदेवांनी चोखोबांची हाडे ओळखून ती गोळा केली व [[पंढरपूर|पंढरपूरला]] विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधली असे चरित्रकार सांगतात.
 
संत चोखोबा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. [[संत नामदेव]] हे त्यांचे गुरू होत. तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. ते शूद्र-अतिशूद्र, गावगाडा, समाज जीवन, भौतिक व्यवहार, उच्चनीचता व वर्णव्यवस्था यांच्या विळख्यात अडकले.
"https://mr.wikipedia.org/wiki/चोखामेळा" पासून हुडकले