"चहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये चहा पाने टाका. उकळी आल्यावर केशर टाका. पुन्हा उकळी काढा.एका भांड्यात मलई दूध उकळून ते वरील चहाच्या मिश्रणात घाला. नंतर साखर घालून पुन्हा उकळी घ्या. हे छोट्या काचेच्या ग्लासात भरून त्यामध्ये किसलेला पिस्ता, बदाम आणि वेलची पूड पसरवून चहा प्यायला द्या.
 
==बुरंश चहा==
 
 
डेहराडून हे बुरंश चहासाठी फार प्रसिद्ध आहे.
साहित्य:
१ कप पाणी
१ चमचा नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश /र्होडोडेन्ड्रोन पाने
१/२ चमचा ग्रीन चहा पावडर
१/२ चमचा पुदिना पाने
चवीनुसार मध साखर
तुळशी पाने (हवी असल्यास)
 
कृती :
पाणी उकळत ठेवून त्यामध्ये बुरंश पाने टाका. उकळी येत असतानाच त्यामध्ये ग्रीन चहा पाने किंवा पुदिन्याची पाने टाका.उकळल्यावर मध किंवा साखर घाला.हवी असल्यास तुळशीची पाने घाला. हा चहा तुम्ही गरम किंवा थंड पिऊ शकता.
सूचना : नैसर्गिकरित्या वाळवलेली बुरंश पाने शॉपिंग पोर्टलवर मिळतात. ती हवाबंद डब्यात भरून ठेवा.
बुरंश किंवा रोडोडेन्ड्रोन चहा हा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशामध्ये स्वागत करताना देतात. कँफेनशिवाय दिवसाची सुरुवात करण्यासाठी अपायकारक रसायनाशिवाय असलेल्या हा सुगंधी चहा फारच छान आहे.बुरंश पाने चहाची चव वाढवतानाच त्यापासून शरीराला होणारे फायदेही देतात. हिमालयात ३५०० ते ४००० मीटर उंचीवर ही
भडक तांबडी घंटेच्या आकाराची बुरंश फुले होतात. उत्तराखंड राज्याचे बुरंश झाड हे राज्यझाड आहे. शेरपा आणि तिबेटीयन लोक बुरंश झाडांना पवित्र झाड मानतात.
 
फायदे :
हा चहा भूक वाढविण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी, डोकेदुखी थांबविण्यासाठी उपयोगी पडतो. चहाच्या डायबेटिस विरोधी आणि अन्य चांगल्या गुणधर्मामुळे हा चहा शरीरास फारच फायदेशीर ठरतो. त्वचा सुधारण्यासाठी हा फारच उपयुक्त पडतो.बुरंश फुलांच्या हंगामात हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड राज्यात हा घरोघरी बनविला जातो.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/चहा" पासून हुडकले