"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो ह्या पानात लिहिलेल्या मजकूराला विश्वकोशीय शैलीत आणण्याची गरज आहे.
ओळ ३४:
आयुष्यभर फकिराचे जीवन जगलेल्या साईबाबांच्या नावाने काढलेल्या संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे. बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले हे संस्थान करोडपती बनले आहे़. साईबाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडित सुवर्ण मुकुटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात येतात.
 
शिर्डी संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या-पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़. आज २०१५२०१९ साली, बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या व चांदीच्या आहेत़.
 
शेवटच्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़. १९२३ साली संस्थानच्या इंपीरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़. आज २०१५ साली, पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरूपात आहेत़. या वर्षी ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़. संस्थानची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़
 
याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने, चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़.
"https://mr.wikipedia.org/wiki/शिर्डी" पासून हुडकले