"परभणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २५:
}}
 
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्टेशन हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्टेशनांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राज्यमहामार्ग जातो. परभणी शहरातील निवासी परभणीकर म्हणून संबोधले जातात.
परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये उरूस भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, वेगवेगळी प्रदर्शने व त्यांची विक्री केली जाते. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृध्द, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात.
 
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.
 
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले.
 
परभणी शहरातील आणखी एक महत्वाचे ठिकाण म्हणजे '''पारधेश्वर महादेव मंदिर'''. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला '''पारद शिवलिंग''' असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.
"https://mr.wikipedia.org/wiki/परभणी" पासून हुडकले