"जोतीराव गोविंदराव फुले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
 
==बालपण आणि शिक्षण==
जोतिबा फुले यांचे मूळ गाव [[सातारा]] जिल्ह्यातील [[कटगुण]] हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म '''११ एप्रिल १८२७''' रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार [[पुरंदर]] तालुक्यातील [[खानवडी]] येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
 
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी [[भाजी]] विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक '''शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये''' त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. '''ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्ता याने महात्मा फुले यांना 'सेंद्रीय बुद्धीवंत' असे संबोधले आहे.''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://msblc.maharashtra.gov.in/pdf/pdf/Maharashtrache%20Shilpkar%20Mahatma%20Jyotiba%20Phule.pdf|शीर्षक=महाराष्ट्राचे शिल्पकार महात्मा जोतीबा फुले|last=गुंदेकर|first=श्रीराम|date=|website=महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई चे संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|ॲक्सेसदिनांक=१९ ऑगस्ट २०१८}}</ref>
 
==शैक्षणिक कार्य==
</poem>
 
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला. त्यांनी इ.स. '''१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा''' काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच '''अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन''' केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.{{संदर्भ हवा}}
 
==सामाजिक कार्य==
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये '''[[थॉमस पेन]]''' यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते.
 
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची '''(अस्तिक्यवादी)''' विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या '''‘शेतकऱ्याचा असूड’आसूड’''' या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचे वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.त्यातील काही महत्वाची वचने लीहिली
<!--[[चित्|इवलेसे|361x361अंश|महात्मा ज्योतिबा फुले ]]<लाल चित्रदुवा>-->
* संसाराविषयी फुले यांचा दृष्टीकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणा-या गृहस्थाश्रमाला ते फार मान देतात. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुध्दीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो. <ref>{{स्रोत पुस्तक|title=संत-सुधारक व त्यांचे धर्मविचार् एक अभ्यास|last=चव्हाण|first=रा. ना. , संपादक श्री. रमेश चव्हाण|publisher=रा.ना. चव्हाण जन्मशताब्दी वर्ष प्रकाशन|year=२०१३|location=पुणे|pages=२४७}}</ref>
 
==सत्यशोधक समाज==
[[२४ सप्टेंबर]] [[इ.स.१८७३]] रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.'''समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते'''.सत्यशोधक समाज सोसायटीचे ते '''पहिले अध्यक्ष आणि खजिनदार''' होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर '''१९ स्त्रियांनी''' सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. ''''सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते'''. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.{{संदर्भ हवा}}
== लेखन साहित्य ==
'[[सार्वजनिक सत्यधर्म]]' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून ''''[[दीनबंधू]]'''' हे साप्ताहिक चालविले जात असे. '''तुकारामाच्या अभंगांचा''' त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. '''आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला.''' ''''अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे'''. '''[[सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक|सार्वजनिक सत्यधर्म]] हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१''' मध्ये प्रकाशित झाला.
 
[[रा.ना. चव्हाण]] यांनी ‘सारसंग्राहक’ या पुस्तकात [[सार्वजनिक सत्यधर्म]] या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.
 
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना '''मुंबईतील सेभेत १८८८ मध्ये ‘महात्मा’ ही [[उपाधी]]''' दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली, त्यांपैकी काही ही :-
{|Align="Center" Border="1" Width="75%"
|- Align="Center" Style="background: #D0D0D0"
| align="left" |
| align="left" | इ.स. १८४७
| align="left" | टॉमस पेन कृत '''“राईट ऑफ मॅन”''' या ग्रंथाचे मनन.
|-
| align="left" | ७
| align="left" | चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
|-
| align="left" | '''१२'''
| align="left" | '''नोव्हेंबर १६'''
| align="left" | '''इ.स.१८५२'''
| align="left" | '''मेजर कँडी''' यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
|-
| align="left" | १३
| align="left" |
| align="left" | इ.स.१८५३
| align="left" | ''''[[दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स]]'''' स्थापन केली.
|-
| align="left" | २१
| align="left" |
| align="left" | इ.स. १८८०
| align="left" | '''दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध''' केला.
|-
| align="left" | ३५
|-
| align="left" | ३९
| align="left" | '''११ मे '''
| align="left" | '''इ.स.१८८८'''
| align="left" | '''मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान केली.'''
|-
| align="left" | ४०
 
== तृतीय रत्‍न ==
'''तृतीय रत्‍न''' या नाटकाचा सारा इतिहास नाट्यपूर्ण आहे. जोतिबांनी '''२८ व्या वर्षी इ.स.१८५५''' साली हे नाटक लिहिले. नाटक लिहिण्याचा हेतू जोतिबा लिहितात, ‘भट जोशी आपल्या मतलबी धर्माच्या थापा देऊन अज्ञानी शूद्रास कसकसे फसवून खातात व ख्रिस्ती उपदेशक आपल्या निःपक्षपाती धर्माच्या आधाराने अज्ञानी शूद्रास खरे ज्ञान सांगून त्यास कसकसे सत्यमार्गावर आणतात, या सर्व गोष्टीविषयी म्या एक लहानसे नाटक करून इ.स. १८५५ मध्ये दक्षिणा प्राइज कमिटीला अर्पण केले; परंतु तेथेही असल्या भिडस्त भट सभासदांच्या आग्रहामुळे युरोपियन सभासदांचे काही चालेना. तेव्हा त्या कमिटीने माझी चोपडी नापसंत केली. अखेर मी ते पुस्तक एकीकडेस टाकून काही वर्षे लोटल्यानंतर दुसरी लहानशी ब्राह्मणांच्या कसबाविषयी नवीन चोपडी तयार करून आपल्या स्वतःच्या खर्चाने छापून प्रसिद्ध केली. "
 
या नाटकाचे प्रत्यक्ष किती खेळ झाले, त्याला प्रतिसाद कसा मिळाला, याविषयी ठोस पुरावा उपलब्ध नाही. प्रथम इ.स. १९७९ मध्ये ‘[[पुरोगामी सत्यशोधक]]’मधून एप्रिल-मे-जूनच्या अंकात नेमक्या प्रस्तावनेसह हे नाटक प्रकाशित झाले. प्रा. सीताराम रायकर यांना बुलढाणा येथील पंढरीनाथ सीताराम पाटील यांच्या संग्रही या नाटकाच्या तीन हस्तलिखित प्रती मिळाल्या. तीनपैकी एका प्रतीवर त्रितीय नेत्र असेही शीर्षक प्रा. रायकरांना आढळले. इ.स. १८५५ मध्ये लिहिलेल्या नाटकाच्या हस्तलिखित प्रती इ.स. १९७९ (१२५ वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर) मिळतात ही एक नाट्यपूर्ण घटनाच आहे. मराठी रंगभूमीचा प्रारंभ इ.स. १८४३ साली विष्णुदास भावे यांनी केला. पण मराठी नाट्यलेखन १८५६ साली प्रथम झाले आणि तेही गो.म. माडगावकर यांच्या ‘व्यवहारोपयोगी नाटक’ या पाचप्रवेशी नाटकापासून असे मानले जाई पण तृतीय रत्‍न (तृतीय नेत्र) या इ.स. १८५५ साली लिहिलेल्या नाटकामुळे पहिले लिखित मराठी नाटक असून, '''जोतिराव फुले हे पहिले मराठी नाटककार आहेत.'''
 
आपली परिवर्तनवादी चळवळ सशक्त आणि परिणामकारक करण्यासाठी ‘नाटक’ या हत्याराचा वापर करण्याचा त्यांचा हेतू होता.
३०

संपादने