"समास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
छोNo edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १०६:
वेशांतर – अन्य असा वेश
भाषांतर – अन्य अशी भाषा
इ) विशेषण उभयपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधरय असे म्हणतात.
उदा.
लालभडक – लाल भडक असा
श्यामसुंदर – श्याम सुंदर असा
काळाभोर – काळा भोर असा
पांढराशुभ्र – पांढरा शुभ्र असा
हिरवागार – हिरवागार असा
कृष्णधवल – कृष्ण धवल असा
ई) उपमान पूर्वपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते. उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
वज्रदेह – वज्रासारखे देह
चंद्रमुख – चंद्रासारखे मुख
राधेश्याम – राधेसारखा शाम
कमलनयन– कमळासारखे नयन
उ) उपमान उत्तरपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
मुखचंद्र – चंद्रासारखे मुख
नरसिंह – सिंहासारखा नर
चरणकमल – कमलासारखे चरण
हृदयसागर – सागरासारखे हृदय
ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.
उदा.
सुयोग – सु (चांगला) असा योग
सुपुत्र – सु (चांगला) असा पुत्र
सुगंध – सु (चांगला) असा गंध
सुनयन – सु (चांगला) असा डोळे
कुयोग – कु (वाईट) असा योग
कुपुत्र – कु (वाईट) असा पुत्र
ए) रूपक कर्मधारय
जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.
उदा.
विधाधन – विधा हेच धन
यशोधन – यश हेच धन
तपोबल – ताप हेच बल
काव्यांमृत – काव्य हेच अमृत
ज्ञांनामृत – ज्ञान हेच अमृत
6. व्दिगू समास
ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्यालाव्दिगू समास असे म्हणतात. या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय समास असेही म्हणतात.
उदा.
नवरात्र – नऊ रात्रींचा समूह
पंचवटी – पाच वडांचासमूह
चातुर्मास – चार मासांचा समूह
त्रिभुवन – तीन भुवनांचा समूह
त्रैलोक्य – तीन लोकांचा समूह
सप्ताह – सात दिवसांचा समूह
चौघडी – चार घडयांचा समुह
7. मध्यमपदलोपी समास
ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्या साठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात. या समासास लुप्तपद कर्मधारेय समास असेही म्हणतात.
उदा.
साखरभात – साखर घालून केलेला भात
पुरणपोळी – पुरण घालून केलेली पोळी
कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे
घोडेस्वार – घोडयावर असलेला स्वार
बालमित्र – बालपणापासूनचा मित्र
चुलत सासरा – नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा
लंगोटी मित्र – लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र
3) व्दंव्द समास :
ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास ‘व्दंव्द समास’ असे म्हणतात. या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.
उदा.
रामलक्ष्मण – राम आणि लक्ष्मण
विटीदांडू – विटी आणि दांडू
पापपुण्य – पाप आणि पुण्य
बहीणभाऊ – बहीण आणि भाऊ
आईवडील – आई आणि वडील
स्त्रीपुरुष – स्त्री आणि पुरुष
कृष्णार्जुन – कृष्ण आणि अर्जुन
ने-आण – ने आणि आण
दक्षिणोत्तर – दक्षिण आणि उत्तर
 
:शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला ''''सामासिक शब्द'''' असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/समास" पासून हुडकले