"सार्वजनिक वाचनालय (नाशिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
ओळ २:
 
==इतिहास==
या वाचनालयाची स्थापना [[सरकारवाडा, नाशिक|सरकारवाड्यात]] झाली. त्यावेळी तिथे इंग्रजी राजवटीची कार्यालये होती. [[इ.स. १८८३]] च्या अहवालात वाचनालयात असलेल्या दोन हजार पुस्तकांचा उल्लेख आढळतो. हा काळ ग्रंथाच्या वाढ आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकहितवादी यांचादेखील सहवास काही काळ नाशिकला होता. त्यांचादेखील संबंधीया ग्रंथालयाचीसार्वजनिक
ग्रंथालयाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्यासंबंध आलेला आहे. लोकहितवादींनी काही ग्रंथ हे नाशिकच्या वास्तव काळामध्ये लिहिले. त्या ग्रंथातील मजकुर नाशिक क्षेत्राशीजुळणारा आहे. या काळामध्ये संदर्भासाठी इतरत्र कुठलेही ग्रंथालय उपलब्ध नव्हते.अशा वेळेस याच ग्रंथालयाचा त्यांना उपयोग झालेला असणार,तसेच या काळात ग्रंथालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी न्यायाधीशांना सरकारने सूचना केलेली होती. परिणामस्वरूप न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी हे न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्यामुळे त्यांचा या ग्रंथालयांनी जवळून संबंध आलेला होता, हे तर्काधिष्ठित पुराव्यांच्या आधारे सिद्ध करणे सहज शक्य आहे. वाचनालयाची जागा अपुरी पडू लागल्याने हे वाचनालय गो.ह. देशपांडे पथावरील राजेबहाद्दर यांच्या वाड्यात स्थानांतरण करण्यात आले. [[इ.स. १९२४]] साली पुन्हा वाचनालय सरकार वाड्यातील दुसर्‍या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले.
 
वाचनालयातील काही अतिशय जुन्या ग्रंथांत व कागदपत्रांवर असलेल्या हस्तलिखित नोंदींनुसार या वाचनालयाची खालील नावे आढळतात. सुरुवातीच्या काळात काही ब्रिटिश अधिकारी ग्रंथालयाची संबंधित असल्याचा पुरावा देखील उपलब्ध होतो.