"लोकमान्य टिळक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
बदलांचा आढावा नाही
छो
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
छो
खूणपताका: दृश्य संपादन अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला !
डेक्कन कॉलेजमध्ये असतांना टिळकांची [[गोपाळ गणेश आगरकर]] यांच्याशी मैत्री झाली. आगरकरांकडे केसरीच्या संपादकपदाची धुरा टिळकांनी दिली होती. पण नंतर दोघांत बिनसले. टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या चाळीस पानी राजीनाम्यात टिळकांनी ‘निर्वाहापुरते वेतन’ या तत्त्वाऐवजी ‘सांपत्तिक स्थितीनुसार वेतन’ तसेच ‘राष्ट्रीय शिक्षण संस्थे’च्या उद्दिष्टाविरुद्ध ‘सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था’ हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धक्के देणारे आहे, असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा '''आगरकरांशी वाद''' झाला. याशिवाय '''दुसरा वाद ‘आधी कोण? राजकीय की सामाजिक?’''' या विषयावर झाला होता.जातिभेद नष्ट झाले पाहिजेत, असे ते निकराने मांडीत. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत, असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की, ‘'''आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक वा धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्मवचनांच्या बाबतींत तडजोड होत असेल, तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही ’.''' <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/17553/|शीर्षक=टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-07}}</ref>
 
===न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी===
त्या काळात [[विष्णुशास्त्री चिपळूणकर]] हे एका सरकारी शाळेत शिक्षक होते. निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरविले होते तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. '''१ जानेवारी १८८०''' रोजी न्यू '''इंग्लिश स्कूलची''' स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पतकरला. विष्णुशास्त्री १८८२ मध्ये मरण पावले तथापि '''१८८४''' मध्ये वेडरबर्न, वर्ड्‌स्वर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, य.मो. केळकर, भांडारकर वगैरे प्रभृतींच्या मदतीने टिळक–आगरकरांनी '''डेक्कन एज्युकेशन सोसायटीची''' स्थापना केली आणि या संस्थेतर्फे '''१८८५''' मध्ये '''फर्ग्युसन महाविद्यालयाची''' स्थापना करण्यात आली. टिळक '''गणित व संस्कृत''' विषय शिकवीत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/17553/|शीर्षक=टिळक, लोकमान्य बाळ गंगाधर|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-07}}</ref>
 
३०

संपादने