"सत्यशोधक समाज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
छोNo edit summary
ओळ २३:
== अधिवेशने/संमेलने : ==
कमीअधिक प्रमाणात सत्यशोधक चळवळ झपाटयाने/काही वेळा मंदपणे फोफावत असली, तरी सत्यशोधक समाजाच्या वतीने तिच्या ध्येय-उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठीच चळवळीचे हे महायान सुरू होते. लोकजागरण, लोकप्रबोधन, लोकसंघटन आणि नवसमाजनिर्मिती या सत्यशोधक समाजाच्या ध्येयसिद्धीसाठी हा सारा खटाटोप, हा उभा प्रयास होता. १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची म. फुले यांनी स्थापना केली मात्र समाज अधिवेशनांची सुरूवात १९११ पासून झाली. १९११ पासून २००७ पर्यंत सत्यशोधक समाजाची एकूण ३५ अधिवेशने संपन्न झाली. पहिले अधिवेशन १७ एप्रिल १९११ रोजी '''पुणे येथे स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावरू''' यांच्या अध्यक्षतेने पार पडले. त्याच्या स्वागताध्यक्षपदी गणपतराव बिरमल होते. पस्तीसावे अधिवेशन २२ डिसेंबर २००७ रोजी गेवराई (जिल्हा बीड, मराठवाडा) येथे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. ‘ मराठवाडा सार्वजनिक सभेचे ’ अध्यक्ष पद्माकरराव मुळे यांनी स्वागताध्यक्षपद भूषविले होते. पुणे ते गेवराई या प्रवासामधली सलग ३३ अधिवेशने अशी आहेत : नासिक, ठाणे, सासवड (पुणे), अहमदनगर, निपाणी, आडगाव (जळगाव), अकोला, सातारा, दांडेगाव (हिंगोली), बेळगाव, शेगाव (हिंगोली), अमरावती, मुंबई, पुन्हा मुंबई, कोल्हापूर, पाडळी (सातारा), मौजे भक्तवाडी (सातारा), औरंगाबाद, पुन्हा पाडळी (सातारा), बोराडी (धुळे), पुन्हा नासिक, नागपूर, वर्धा, यवतमाळ, सांगली, मुकुंदवाडी (अहमदनगर), वान्द्रे (पूर्व), अकोला, लातूर, सातारा, पुन्हा औरंगाबाद, चिखली, गेवराई.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/33899/|शीर्षक=सत्यशोधक समाज|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-07}}</ref>
 
== कार्य व उपक्रम : ==
सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी म. फुले यांनी घटना बनविली. तद्नुषंगाने नियमावली तयार केली.मूलतः सत्यशोधक समाज एकच निर्मिक, एक धर्म, एक मनुष्यजात मानणारा म्हणून स्थापन झाला. त्याची आचारसंहिता सार्वजनिक सत्यधर्म या गंथात दिली असून, त्यात ढोबळ नियम सांगितले आहेत. त्यांनुसार समाजाच्या कार्यकारिणीत सुरूवातीस '''म. जोतीराव फुले हे चिटणीस आणि डॉ. विश्राम रामजी घोले हे अध्यक्ष''' होते. वर्षातून कार्यकारिणीच्या सर्वसाधारण चार सभा, लोकशाही पद्धतीने कार्यकारी मंडळाची निवड व बहुमताने निर्णय, अशी सर्वसाधारण सूत्रे होती. '''सुरूवातीस दर रविवारी डॉ. गावडे यांच्याकडे अनौपचारिक रीत्या मंडळी जमत'''. समाजापुढील प्रश्न, सोडवणुकीचे उपाय व सदय:स्थिती यांविषयी चर्चा होत आणि दर '''पंधरा दिवसांतून एक व्याख्यान असा उपक्रम''' असे.
 
सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे. (१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही. (२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही. (३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो. (४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही. (५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही. (७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि (८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.
 
<br />