"मामा परमानंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३७३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
(Addititonal information)
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
खूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.
बेंजामिन फ्रँक्लिनच्या चरित्राचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. न्या. रानडे यांनी मामांना ‘राजकीय ऋषि’ ह्या महनीय पदवीने गौरविले. मामांचा अवघा संसार परमार्थावर आधारलेला होता. त्यांचे घर म्हणजे विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान, अनेक परस्थ थोर थोर पुढाऱ्यांच्या व पाहुण्यांच्या वर्दळीचे ठिकाण व पुनर्विवाहितांचा आश्रम असेच होते. त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी सहधर्मचारिणी या नात्याने मामांना अखेरपर्यंत चांगली साथ दिली. मामांचा स्वभाव प्रसिद्धीविन्मुख व सोशिक होता.
 
तरुणास उपदेश-पितृबोध (१८८५), पितृबोधाच्या इंग्रजी, मराठी व गुजराती भाषेतही आवृत्त्या निघाल्या. मामांची एका संस्थानिकास बारा पत्रे (मूळ इंग्रजी – १८९१, म. भा. १९६३), एच्. ए, ॲक्‌वर्थ यांना मराठी पोवाडे संकलित करण्याच्या कामी मामांनी बहुमोल सहकार्य केले. त्यांचा उपलब्ध असलेला इंग्रजी व मराठी पत्रव्यवहार आजही महत्त्वाचा आहे. सयाजीराव गायकवाड यांनी मामांची योग्यता व कार्य चांगले जाणले होते. म. जोतीराव फुले यांच्या शेवटच्या आजारात आर्थिक साह्य मिळावे म्हणून बडोदे सरकारला मामांनी लिहिलेली पत्रे फुल्यांच्या चरित्रावर व कार्यावर चांगला प्रकाश टाकणारी ठरली आहेत. सर्व वर्ग व सर्व थरांतील समकालीन मोठमोठ्या कर्त्या पुढाऱ्यांचे ते सल्लागार होते. मुंबईस त्यांच्या राहत्या घरी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांचे मित्र व सहकारी डॉ. रामकृष्ण भांडारकर, शांताराम विठ्ठल, तुकाराम तात्या, नारायण चंदावरकर, भास्कर हरि भागवत, श्रीधरपंत भांडारकर वगैरे जीवाभावाची मंडळी सभोवती जमली असताना मामांचे प्राणोत्क्रमण झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mr.vikaspedia.in/education/apala-bharath/92d93e930924-92a94d93093893f92794d926-93594d92f91594d924940/92e93e92e93e-92a93092e93e928902926|शीर्षक=मामा परमानंद — विकासपीडिया|संकेतस्थळ=mr.vikaspedia.in|अॅक्सेसदिनांक=2019-09-07}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/28916/|शीर्षक=मामा परमानंद|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2019-09-07}}</ref>
 
 
 
३०

संपादने