"समास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ९:
पंचवटी – पाच वडांचा समूह
समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. तत्पुरुष समास
3. व्दंव्द समास
4. बहुव्रीही समास
1) अव्ययीभाव समास :
ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात. अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतील शब्द
उदा.
गावोगाव– प्रत्येक गावात
गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत
दारोदारी – प्रत्येक दारी
घरोघरी – प्रत्येक घरी
मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) संस्कृत भाषेतील शब्द
उदा.
प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन
आ (पर्यत) – आमरण
आ (पासून) – आजन्म, आजीवन
यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.
वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपस्वर्गाना अव्यय मानले जाते.वरील उदाहरणामध्ये हे उपस्वर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपस्वर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे.
क) अरबी व फारसी भाषेतील शब्द
उदा.
दर (प्रत्येक) – दरसाल, दरडोई, दरमजल.
गैर (प्रत्येक) – गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त
हर (प्रत्येक) – हररोज, हरहमेशा
बे (विरुद्ध) – बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक
वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपस्वर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.
 
:शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला ''''सामासिक शब्द'''' असे म्हणतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/समास" पासून हुडकले